जवळे विद्यालयाचा आषाढी एकादशीनिमित्त पायी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न.

जवळे:- भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रुप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने कै.सौ. वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै.अण्णासाहेब घुले-सरकार कनिष्ठ महाविद्यालय जवळे या प्रशालेचा पायी दिंडी सोहळा मंगळवार दिनांक 16 जुलै रोजी मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
तत्पूर्वी सकाळी विद्यालयात पायी दिंडीची सुरुवात पालखीचे पूजन करून करण्यात आली.श्री विठ्ठल,रुक्मिणी,संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर,संत मुक्ताबाई,संत सोपान देव यांच्या वेशभूषेत विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा जयघोष करीत टाळ वाजवीत ज्ञानेश्वरी ग्रंथ,भगवी पताका खांद्यावर घेऊन तसेच डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पालखी समवेत जवळे विद्यालयाचे विद्यार्थी,विद्यार्थिनी पायी दिंडीमध्ये सहभागी झाले होते.पुढे हा दिंडी सोहळा मा.आ.दीपक आबा साळुंखे-पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचल्यावर तिथे दिंडीचे युवा नेते यशराजे दीपकराव साळुंखे-पाटील यांनी स्वागत केले.
यावेळी ह भ प कै.शारदादेवी(काकी)साळुंखे-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.उपस्थित शिक्षक शिक्षिका व विद्यार्थ्यांनी काकींच्या प्रतिमेला पुष्प वाहिले. त्यानंतर पायी दिंडी सोहळा श्री.नारायणदेव मंदिर नंतर जुनी चावडी येथे आल्यावर तेथील ग्रामस्थांनी दिंडीचे स्वागत केले. तेथेआरती झाल्यानंतर पुढे छत्रपती संभाजीराजे चौकातून दिंडी सोहळा हरिनामाचा जयघोष करीत पुन्हा विद्यालयाच्या प्रांगणात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी गोल रिंगण करून ज्ञानोबा तुकाराम माऊलीचा गजर केला.दिंडी सोहळ्याची सांगता झाली.हा दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य श्री.बाळासाहेब शिंदे सर,उपप्राचार्य श्री.संजय पौळ सर सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले