फॅबटेक इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांची कोल्ब्रो ग्रुप प्रा. लि मध्ये निवड

सांगोला : फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पूल कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन कोल्ब्रो ग्रुप प्रा. लि. नाशिक यांचे तर्फे घेण्यात आले होते या मध्ये पाच इंजिनिअरिंग महाविद्यालयांतील १२० विद्यार्थ्यांनी सहभाग नोदविला होता. यामधून फॅबटेक इंजिनिअरिंग च्या २४ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे आणि ही निवड परीक्षा , संभाषण कौशल्य,व मुलाखत माध्यमातून झाली असल्याची माहिती ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे यांनी दिली.
यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील अनिल बुरुंगले – घेरडी ,रमेश बुरुंगले – घेरडी , एरंडे धुळाप्पा –निगडी बु.-उमदी , शिंदे मायाप्पा – मारोळी , घुटूकडे रघुनाथ- खैराव ,अलदार धीरज – सांगोला, पाटील शुभम – बामणी तर सिव्हील विभागातून कुलकर्णी श्रीपाद – सांगोला , गोडसे शुभम – सांगोला ,काळे विकास – सांगोला, इंगोले शुभम –सांगोला , पवार राजवर्धन- वाटंबरे,सर्गुले – करकंब ,भोर सागर – गौडवाडी, बेलदार गोरख – मंगळवेढा, इंगवले वैभव – मेडशिंगी , जावीर अभिषेक – आटपाडी, बनसोडे प्रवण – सांगोला, कारंडे वैभव- जुनोनी , फुलारी रहील – सांगोला, मुजावर शबाब – सांगोला, बाबर प्रथमेश – मानेगाव, माळी अजिंक्य- सांगोला. तर डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातून बजबळे अर्जुन – काशिलिंगवाडी, जत. या विद्यार्थ्याची निवड झाली आहे .
फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेज, ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करीत असते . या विभागामार्फत संभाषण कौशल्य व मुलाखती चे प्रशिक्षण दिले जाते. याचबरोबर विद्यार्थ्याचे भविष्याचा विचार करून व करियरच्या द्ष्ठीने मार्गदर्शन या विभागामार्फत केले जाते .
निवड झालेल्या विद्यार्थाचे संस्थेचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ .अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री.दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ .संजय अदाटे, प्राचार्य डॉ आर बी शेंडगे व सर्व विभाग प्रमुख , शिक्षकेतर कर्मचारी याच्यासह पालकांनी कोल्ब्रो ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्याचे अभिनंदन केले. ट्रेनिंग प्लेसमेंट को-ऑर्डिनेटर प्रा. शरद आदलिंगे, प्रा.अतिश जाधव , प्रा. अविनाश सुर्यागण , प्रा.दुर्गा पाटील व प्रा.शशिकांत माने यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.