sangola

सावे माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पायी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न

HTML img Tag Simply Easy Learning    

सावे माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पायी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न.

 

आषाढी एकादशीच्या निमित्ताने सावे माध्यमिक विद्यालयात दिनांक 16 -7- 2024 रोजी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

 

दिंडीच्या निमित्ताने विद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी विठ्ठल आणि रुक्मिणीच्या वेशभूषेत आले होते. सुरुवातीला विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर यांनी केले. त्यानंतर दिंडी विद्यालयातून गावाकडे विठू नामाच्या जयघोषात हनुमान मंदिर येथे पोहोचली .तेथे भजन, किर्तन, रिंगण व फुगडी इत्यादीचा आनंद सर्व विद्यार्थ्यांनी घेतला.

 

सदर पायी दिंडी सोहळ्यामध्ये विठ्ठलाच्या वेशभूषेत कु. मयुरी माने आणि रुक्मिणीच्या वेशभूषेत कु. माया चव्हाण या सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर सदर दिंडी गावातून भजन व कीर्तन करीत सावळेश्वर मंदिर येथे पोहोचली .तेथे टाळ व मृदंगाच्या तालावर सर्व विद्यार्थ्यांनी ताल धरला. विद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते.

 

ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा तुकाराम, माऊली माऊलीचा गजर करत विद्यार्थ्यांनी गोल रिंगण सोहळ्याचा आनंद घेतला. सावळेश्वर मंदिरामध्ये श्री संत ज्ञानेश्वर सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल श्री संजय सरगर , पोपट बंडगर व भारत स्वामी यांनी विद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना खाऊ म्हणून बिस्कीट पुडे दिले. तसेच सावे ग्रामपंचायत तर्फे ही विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून बिस्किट पुड्यांचं वाटप करण्यात आले.

सावळेश्वर मंदिरामध्ये मंदिर समितीच्या वतीने विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विद्यालयाच्या वतीने मंदिर समितीतील श्री.पोपट बंडगर ,संजय सरगर, भारत स्वामी यांचाही सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर दिंडीतील विठ्ठल- रुक्मिणीच्या भूमिकेतील कुमारी मयुरी माने व माया चव्हाण यांचा सत्कार मंदिर समितीच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर ही दिंडी विद्यालयाच्या दिशेने मार्गस्थ झाले. त्यानंतर विद्यालयामध्ये सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयातील सहशिक्षक श्री बर्गे सर यांचे तर्फे जिलेबीचे वाटप करण्यात आले .अशा प्रकारे या पायी दिंडी सोहळ्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व समस्त ग्रामस्थ, पालक वर्ग यांचे सहकार्य लाभले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!