महाराष्ट्र
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्ये पं. नेहरू यांची जयंती उत्साहात साजरी

सांगोला : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू पुष्पहार अर्पण करून नेहरूंच्या विचारांचे महत्व सांगत उपस्थितांना प्रेरित केले. तसेच डिप्लोमा अभियांत्रिकीचे प्राचार्य प्रा.तानाजी बुरुंगले यांनी नेहरूजींना आदरांजली अर्पण करून नेहरूजींचे विचार व त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
हि जयंती संस्थेचे चेअरमन मा.श्री भाऊसाहेब रूपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, व्यवस्थापक प्रतिनिधी प्राजक्ता रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली .



