महाराष्ट्र

सांगोला फॅबटेक मध्ये सहा दिवसीय कार्यशाळा

सांगोला तालुक्यातील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात सोमवार दिनांक १९ मे २०२५ रोजी सहा दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती काॅलेजच्या उप-प्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर यांनी दिली.

फॅबटेक काॅलेज मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात “तांत्रिक प्रशिक्षण आणि ॲन्सिस साॅफ्टवेअर” या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन उप-प्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. राहूल आवताडे, मार्गदर्शक तुकाराम वरक, डाॅ. पवार, प्रा. शिवपुजे, कार्यक्रम प्रतिनिधी प्रा. जाकुकोरे आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली.

 

या कार्यशाळेत प्रमुख वक्ते तुकाराम वरक यांचे पुष्पगुच्छ देऊन महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
या कार्यशाळेत बोलताना तुकाराम वरक म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्वतःचे ज्ञान, कौशल्य आणि अट्युटूड आत्मसात केले पाहिजे. अन्सिस साॅफ्टवेअर मुळे विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये मोठे पॅकेज च्या नोकरी उपलब्ध होणार असल्याचे मत तुकाराम वरक यांनी कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. राहूल आवताडे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, इन्स्टिट्यूट आणि इंडस्ट्रील या दोघांमध्ये समन्वय साधायचा असेल तर टेक्निकल कार्यशाळा आयोजित करणे आवश्यक असल्याचे मत प्रा. आवताडे यांनी यादरम्यान व्यक्त केले.

ही १९ मे २४ मे २०२५ या कालावधीत संपन्न होणार असुन मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग द्वितीय व तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हि कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारीवर्ग परीश्रम घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button