सांगोला : कॅम्पस प्लेसमेंट मध्ये अग्रेसर असणाऱ्या फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज मधील 22विद्यार्थ्यांची जॉन डियर कंपनी मध्ये कॅम्पस इंटरव्यूव्ह द्वारे निवड करण्यात आली.जॉन डियर कंपनीच्या निवड समितीने सांगोला येथील फॅबटेक पॉलिटेक्नीकच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच व्यवहारिक आणि तांत्रिक ज्ञानावर प्रभावित होऊन महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागातून श्रीयश ढोले , मयूर आतकर,प्रथमेश आलदर, सतीश गेंड,संभाजीराजे घाडगे ,ओंकार नरळे तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन मधून यश जाधव, दीक्षा मेटकरी, समृद्धी शिंदे, योगेश पवार, तनुजा सुर्यगण, उमेश बळवंतराव , शुभमगिरी, सुजाता बंडगर,सीमा हजारे,मोनिका मलमे, स्नेहल पाटील , भाग्यश्री साखरे ,शाहरुख मुल्ला,अधिकराव गडदे , यशराज मेटकरी व दीक्षा चंदनशिवे अशा 22 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
फॅबटेक पॉलिटेक्निक मध्ये नवनवीन व आंतरराष्ट्रीय कंपन्या नियमित येतात आणि कंपनीसाठी पात्र असे विद्यार्थी निवडतात. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी स्थिर होवून आपले उत्तम करिअर घडवीतात. कंपनीला कशा प्रकारचे विद्यार्थी हवे असतात याचा सखोल अभ्यास करून मागणी तसा पुरवठा या तत्वाप्रमाणे संबंधित प्रशिक्षण तज्ञामार्फत विद्यार्थ्यांना दिले जाते. त्यामुळे फॅबटेक पॉलिटेक्नीकमध्ये प्लेसमेंटचे प्रमाण वाढत असल्याचे पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा.तानाजी बुरुंगले यांनी सांगितले
सदर विद्यार्थ्यांना सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे विभाग प्रमुख प्रा. धनंजय शिवपुजे , डिप्लोमाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट को-ऑर्डिनेटर प्रा.तन्मय ठोंबरे व प्रा. राहुल काळे , मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. दत्तात्रय नरळे आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख प्रा. महेश वाळूजकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या निवडणीमुळे शिक्षण पूर्ण होण्या आधीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी प्राप्त झाल्यामुळे विशेषतः पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्याचे संस्थेचे चेअरमन श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.