1992च्या इयत्ता 10 च्या विद्यार्थ्यांची भेट घडून येण्यास तब्बल 32 वर्षाचा कालावधी

सांगोला(प्रतिनिधी):- न्यू इंग्लिश स्कूल सांगोला येथील सन 1991-92 या सालात इ.10 वी मध्ये शिकणार्या चार तुकड्यातील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी चा स्नेह मेळावा शिक्षकांच्या सोबतीने शनिवार दिनांक 8 जून 2024 रोजी न्यू इंग्लिश स्कूल सांगोला येथे पार पडला. कार्यक्रम दोन सत्रामध्ये आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात करताना स्टेजवर झाडाची कुंडी ठेवली होती. या झाडाला शिक्षकांच्या हस्ते पाणी घालून आगळ्यावेगळ्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आले
कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका तात्कालीन शिक्षकांना देण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक यांनी डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला, न्यू इंग्लिश स्कूल ज्यु.कॉलेज सांगोला येथे एकत्र येऊन फोटो घेऊन हलगीच्या तालावर वाजत गाजत जाऊन शाळेच्या आवारातील शाळेचे संस्थापक डॉक्टर भाई गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याला संस्थेचे सचिव विठ्ठलराव शिंदे सर यांच्या हस्ते पुष्पहार घालून सर्वांनी अभिवादन केले. त्यानंतर सर्व मुली व शिक्षकांना फेटे बांधून एका वर्गात बैठकीचे नियोजन केले होते यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून दिली यामध्ये विद्यार्थ्यांच्या वतीने श्री राजू मगर यांनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर शिक्षकांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तब्बल 32 वर्षानंतर आपल्या विद्यार्थ्यांना भेटून त्यांची प्रगती पाहून शिक्षक वृंद सुखावला. यावेळी श्री भोसले सर, श्री कस्तुरे सर , श्री कांबळे सर, श्री बनकर सर, सौ कुलकर्णी मॅडम व श्री पांचाळ सर यांनी सर्वांनी मार्गदर्शन केले.
यावेळी विठ्ठलराव शिंदे सरांनी या शाळेच्या स्थापनेपासूनचा आजवरच्या वाटचालीचा चित्रपट आपल्या शैलीमध्ये सर्वांच्या नजरेसमोर उभा केला हे सांगताना त्यांनी तुम्ही जसे मोठे झाला त्याचप्रमाणे ही दोन खोल्यांची शाळेचे भव्यदिव्य इमारतीमध्ये परिवर्तन झाल्याचे सांगितले. या शाळेच्या उत्कर्षामध्ये संस्थाचालक शिक्षक यांचा जेवढा सहभाग आहे त्याहीपेक्षा मोठा सहभाग हा या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आहे. शाळेच्या प्रगतीमध्ये या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री शिंदे सर यांनी केले.
यानंतरच्या दुसर्या सत्रामध्ये याच बॅचमधील एक विद्यार्थी श्री विनोद बेले यांच्या कृषी पर्यटन उद्योगाअंतर्गत येणार्या मामाचा गाव या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. पण निसर्गाच्या अडथळ्याला गृहीत धरून आयोजकांनी केलेला प्लॅन बी म्हणजे हॉटेल मुक्ताई मंगल कार्यालय येथे दुसर्या सत्राची सुरुवात केली. यावेळी मुलींची संगीत खुर्ची आयोजित करण्यात आली यानंतर डीजेच्या तालावर सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी मनसोक्त डान्स केला. यावेळी सर्वांना फोटो फ्रेम देण्यात आली.
या कार्यक्रमानिमित्त उपस्थित शिक्षकांना आ.ह .साळुंखे लिखित विद्रोही तुकाराम व याच बॅचमधील विद्यार्थी मिनाज मुल्ला यांच्या यशोगाथेचा समावेश असलेले अक्षय गुंड लिखित टर्निंग पॉईंट हे पुस्तक देण्यात आले या कार्यक्रमानिमित्त या बॅच कडून शाळेला डायस भेट देण्यात आला
सदर कार्यक्रमांमध्ये विशेष कर्तुत्वान विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये उप जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, अॅड सुरेश जगताप, नोटरी पब्लिक डॉक्टर सुरेश गवळी, पीएचडी सविता भोसले, एव्हरेस्ट बेस्ट कॅम्प ट्रेकर व डॉक्टर सविता बगाडे (सिद) यांचा समावेश होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्ता जाधव, गणेश भंडारे, किशोर कडव, राजू मगर, अण्णासाहेब मदने, विनोद बेले, बापू ढोले, सचिन पवार, अमित सलगर, बाळू बनकर, अरिफा मुलाणी, शैलजा म्हेत्रे, वंदना भजनावळे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी मुंबई, पुणे, संभाजीनगर, रत्नागिरी, राजापूर येथील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमासाठी 87 विद्यार्थी हजर होते.सूत्रसंचालन श्री गणेश भंडारे यांनी केले