मृगाच्या पावसाने मान नदी तुडुंब, बळीराजा सुखावला
नाझरे येथील मान नदीवर बंधारा असून अडचण नसून खोळांबा

नाझरे परिसरात मृग नक्षत्राच्या पावसाने शेतकरी सुखावला असून, चांगली उघडीप झाल्यानंतर खरिपाच्या पेरणीला वेग येणार असून, मृग नक्षत्र प्रथमच दहा वर्षात बरसले व आठवड्यात तर पावसाने कहर केला असून 10 जून अखेर 188 मि.मि. पाऊस पडला असून पावसाने सरासरी महिन्यातच ओलांडली. पावसामुळे माण नदी तुडूंब झाली खरी परंतु नदीवरील बंधारा असून अडचण नसून खो ळांबा अशी अवस्था आहे.
नाझरे येथील मान नदीवरील बंधारा बांधल्यापासून ा बंधार्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने या बंधाऱ्यात येणारे पावसाचे पाणी अगर मध्ये सोडलेले टेंभूचे पाणी अडले नाही कारण या बंधाऱ्याला गळती आहे त्यामुळे या बंधाऱ्यात पाणी थांबत नाही त्यामुळे मान नदी काठावरील वझरे, नाझरे, बलवडी व आसपास च्या शेतकऱ्यांना या पाण्याचा उपयोग होत नाही व दरवर्षी शेतकरी बंधारा दुरुस्त व्हावा व यामध्ये पाणी थांबावे अशी मागणी करत आहेत परंतु प्रशासनाचे अधिकच दुर्लक्ष झाल्याने या बंधाऱ्याची गळती कधी थांबणार, बंधारा कधी दुरुस्त होणार, त्यामुळे बंधारा असून अडचण नसून खोळांबा अशी अवस्था आहे. तरी प्रशासनाने याकडे ताबडतोब लक्ष देऊन बंधारा दुरुस्त करावा अशी शेतकऱ्यांची ग्रामस्थांची मागणी आहे.
मृग नक्षत्राच्या पावसाने विहिरी, बोअर च्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार असून, पावसाने उघडीप दिल्यानंतर खरिपाच्या पेरणीला जोर येणार आहे परंतु पाऊस तर पडू द्या पेरणी थोडीफार लांबली तरी काही अडचण नाही अशी शेतकऱ्यात बोलले जात आहे.