राजुरीत शेतीच्या विजेचा खेळ खंडोबा; बळीराजा झाला हैराण; पाच दिवस झालं शेतीची लाईट नाही जनावरांना पाणी कसं पाजायचं शेतकऱ्यासमोर प्रश्न…
सांगोला तालुक्यातील राजुरी येथील हातीद जवळा रोडवर मानेगाव टाकी परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे पाच दिवस झाले लाईट जाऊन अजून लाईटचा पत्ता नाही. पुरवठा विभागाचे इंजिनिअर्स, अधिकारी वर्ग फ़ोन उचलत नाहित. चुकून फ़ोन उचलला गेला तर विषय गांभीर्याने घेतला जात नाही. बऱ्याच वेळेला जाणीवपूर्वक लाईट बंद करून ठेवली जात आहे. तरी सभंदित कर्मचारी वर्गांवर कारवाई व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे.
राजुरी भागात हातातोंडाशी आलेले पीक वाया जाऊ लागत असल्याने तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान गेल्या काही पाच दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून याला शेतकरी वैतागले आहेत. दुरुस्ती फॉल्टचे कारण सांगून शेतीची लाईट जवळपास ७२ तास झाले बंद आहे. पाच पाच दिवस जर प्रॉब्लेम निघत नसेल तर वायरमनचे काय काम आहे असा प्रश्न जनतेतून होत आहे. लाईट पूर्णदाबाने मिळत नसल्याने विद्युत मोटारी चालत नसल्याने शेतकऱ्यांना रात्रीच पाणी द्यावे लागत आहे. दिवसा होल्टेजची समस्या येत असून, विद्युत मोटारी चालत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
चालूवर्षी पाऊस चांगला झाल्याने विहिरी व बोअरवेलला चांगले पाणी उपलब्ध आहे. परंतु लाईट बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.यावेळी इंजिनिअर अशोक आबा नरळे, सेवानिवृत्त तहसीलदार संजय खडतरे विश्वास कुटे, नरहरी करपे, यांनी वीज मंडळाचे भोंगळ कारभाराबाबत माहिती दिली आहे.