आचार संहिताचे काटेकोर पालन करा: निवडणूक निर्णय अधिकारी अमित माळी

सांगोला २५३ विधानसभा मतदार संघाची सभा आज दिनांक १६/१०/२०२४ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी अमित माळी उपविभागीय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे तहसिलदार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सुधीर गवळी मुख्याधिकारी नगरपालीका, उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP विक्रांत गायकवाड, PI भिमराव खणदाळे, सांगोला निवासी नायब तहसिलदार सोमनाथ साळुंखे, नोडल अधिकारी मिडीया मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी हजर होते. त्याचबरोबर पत्रकार परिषदे मध्ये सर्व प्रतिनिधी व संपादक हजर होते. त्यानंतर तालुक्यातील सर्व विभागप्रमुख यांची बैठक घेण्यात आली या बैठकिस सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
या सभेला मार्गदर्शन करताना निवडणूक निर्णय अधिकारी अमित माळी यानी खालील प्रमाणे सविस्तर मार्गदर्शन करुन माहीती देण्यात आली. दिनांक १५/१०/२०२४ पासून निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. याबाबत आचार संहिताचे काटेकोर पालन करणे बाबत सुचना देण्यात आल्या तसेच दिनांक २२/१०/२०२४ ते २९/१०/२०२४ उमेदवारी अर्ज सकाळी ११.०० ते ३.०० सुटीचे दिवस सोडून अर्ज स्विकारणेत येतील तसेच ३०/१०/२०२४ रोजी अर्जाची छाननी करुन अर्ज मागारी घेण्याची शेवटची तारीख ०४/११/२०२४ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत स्विकारले जातील याची नांदे घ्यावी. तसेच २०/१०/२०२४ रोजी मतदान घेण्यात येणार आहे व २३/११/२०२४ रोजी मतमोजणी होणार आसल्याचे सांगीतले तसेच यावेळी २५३ सांगोला विधानसभा मतदार संघात ३०९ बुथ असून संवेदनशिल बुबवर CC TV बसविण्यात येणार आहेत.
एकूण मतदार संख्या ३२९०४८/- असून पुरुष मतदार १७०६९०/ व स्वी मतदार १५८३५३/- व इतर ५ मतदार आहेत. तसेच सैनिक ८९०/- मतदार आहेत. या निवडणूकीसाठी झोनल ऑफीसरच्या ३४ टिम नोडल ऑफीसरच्या २४ टिम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ३ टिम सेक्टर ऑफीसर पोलीस १२ टिम PI, DYSP नोडल अधिकारी असतील तसेच SST VST VVT आणी फलॉइंग स्कॉड नेमण्यात आले असून तहसिल कार्यालयात २४ तास कंट्रोल रुम उघडण्यात आलेली आहे.
२५३ सांगोला विधानसभा मतदार संघात ८५ एकूण मतदार ४२२१/- व दिव्याग मतदार ३१५६/- आहेत. त्यानी १२ डी फॉर्म भरुन दिल्यास त्याना होम ओटींग सुविधा पुरविण्यात येतील याबाबत सुचना देण्यात आल्याची माहीती मिडीया नोडल अधिकारी मिलिद सावंत यानी दिली.



