महाराष्ट्र शासन कृषि विभाग मार्फत दि.21 ते 25 ऑगस्ट 2024 या कालावधीत बीड जिल्हयात कृषि उत्पन्न बाजार समिती, कॉटन मार्केट यार्ड, नाथ रोड, परळी वै. जि.बीड येथे परळी वैजीनाथ राज्यस्तरीय कृषि महोत्सव 2024 ” आयोजित करण्यात येणार असून त्याचा 5 दिवसाचा कालावधी असणार आहे.
या कृषि महोत्सवात शेतक-यांना विविध कृषि योजना उपक्रमांची माहिती, संशोधित कृषि तंत्रज्ञान नाविन्यपुर्ण प्रयोगशिल शेतक-यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषि पुरक व्यवसाय इ.बाबतचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहेत. तसेच कृषि विषयक परिसंवाद आणि अनुभवी शेतकरी उदयोजकांची व्याख्याने यशस्वी शेतकरी, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व विचारवंत यांची थेट भेट घडावी व सामान्य शेतक-यांच्या शंका निरसन करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर आधारित धान्य व खाद्य महोत्सव तसेच फळे, फुले व भाजीपाला महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.
या महोत्सवास मुख्यमंत्री महोदय, मा. मंत्री, मा. खासदार, मा. आमदार, मा. लोकप्रतिनिधी व राज्यस्तरीय अधिकारी व शेतकरी उपस्थित राहणार आहेत. त्यानुषंगाने जिल्हयातील सर्व शेतकरी बंधू व भगिनीना जास्तीत जास्त संख्येने या राज्यस्तरीय कृषि महोत्सवात्स उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.