सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

हटकर मंगेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या शोभा आवडाप्पा भुसनर यांची बिनविरोध निवड

सांगोला – हटकर मंगेवाडी ता सांगोला येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांचे कट्टर समर्थक शोभा आवडप्पा भुसनर यांची बिनविरोध निवड करण्यात आली दरम्यान निवडीनंतर शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळण करीत फटाके फोडून जल्लोष केला.

हटकर मंगेवाडी ता सांगोला येथील ग्रामपंचायतीचे सरपंच जगन्नाथ भुसनर यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला होता रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या निवडीसाठी निवडणूक निर्णयाधिकारी वर्षा बारबडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची सभा घेण्यात आली यावेळी सरपंच पदासाठी शिवसेनेच्या शोभा आवडाप्पा भुसनर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी उपसरपंच श्रीमती नानूबाई भुसनर, ग्रामसेवक स्वप्नील ठोंबरे उपस्थित होते निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच शोभा भुसनर यांचा आमदार शहाजी बापू पाटील संपर्क कार्यालय येथे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना नूतन सरपंच शोभा भुसनर म्हणाल्या, आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात घेऊन गावचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, माजी नगरसेवक प्रा. संजय देशमुख, युवा नेते जगदीश पाटील,सोमा मरगर, संजय काशीद,माजी सरपंच जगनाथ भुसनर, नामदेव पाटील, भारत एरंडे, चंद्रकांत डोरले, महादेव भुसनर, गोविंद भुसनर, धनजयं पाटील तात्यासाहेब बंडगर, अमोल जाधव संदीप गुरव, महादेव कलगुंडे उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!