कोळा परिसरात लग्नसराईमुळे पाणी जारची मागणी वाढली…?

सांगोला तालुक्यातील कोळा जुनोनी परिसरात सध्या लग्न सराई सुरू असल्याने लग्नातील व-हाडी पिण्यासाठी थंड पाण्याचे जार घेतले जात आहेत. कडक उन्हामुळे थंड पाण्याच्या जारची मागणी वाढली आहे. पाण्याचा व्यवसाय तेजीत असल्याचे चित्र दिसत आहे. कोळ्या सारख्या ग्रामीण भागात सुद्धा पाण्याचे जार वापरणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढली आहे.
अगोदर मोजकेच नागरिक पाण्याचे जार घेत होते मात्र आता जवळपास सर्वच घरोघरी पाण्याचे जार नागरिक वापरत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या लग्न सराई मोठ्या उत्साहात पार पडत असून उन्हाचे तापमानही जोरात वाढत आहे. त्यामुळे थंड पाणी पिण्याची इच्छा नागरिकांची होत आहे. त्यामुळे दिवसाला मोठ्या प्रमाणात जारचे पाणी विकत घेतले जात आहे. पूर्वी श्रीमंताच्या घरी व लग्नात जारचे पाणी दिसायचे मात्र आता ते गरिबांच्याही घरी व लग्नातही आपणही समाजाचे काही तरी देने लागतो म्हणून प्रत्येक जण आपल्या दुकानासमोर समोरच पिण्यासाठी थंड पाण्याची जार ठेवत आहेत.
येथून जाणारे अनेक वाहनधारक थंड पाणी पिऊन सोबत असलेली छोटी बॉटल भरून नेतात. शेतकरी, महिला तसेच अन्य व्यक्तीही या सेवेचा लाभ घेतात.उन्हाचे दिवस असल्याने वारंवार तहान लागते त्यामुळे थंड पाणी पिण्याची इच्छा नागरिकांना होते. पूर्वी लग्नकार्य किंवा छोटे मोठे कार्य असल्यास पाण्याचे टँकर घेतले जायचे मात्र आता फक्त पाण्याचे टँकर हे सांडपाण्याचा वापरासाठी घेतले जात आहेत.