बीएससीईआर चा गरीब व हुषार मुलांना मदतीचा स्तुत्य उपक्रम

पुणे येथील बी एस कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च (CBSCER) या ना नफा (Non-Profit Organisation) संस्थेतर्फे फार्मसी क्षेत्रांतील (महाविद्यालयांतील) अत्यंत हुषार व गरीब विद्यार्थ्याना स्कॉलरशिप दिली जाते विद्यार्थ्याना करिअर विषयी मोफत मार्गदर्शन (mentorship) केले जाते.
मेंटोरशिप उपक्रमांतर्गत BSCER च्या वतीने फार्मा कंपनी मधील तज्ञ व्यक्ती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात जानेवारी ते मार्च २०२४ या कालावधीत BSCER ने पुणे, अहमदनगर, सोलापुर व कोल्हापुर जिल्ह्यातील फार्मसी कॉलेजच्या ९ विद्यार्थ्याना अशा प्रकारची मदत केली आहे सांगोला येथील फॅबटेक कॉलेज आफ फार्मसी मधील विद्यार्थीनी कु शुभांगी गंगथडे हिला या कौन्सीलतर्फे आर्थिक मदत (स्कॉलरशिप) भेटणार आहे. या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय बैस यांनी या कामी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले अशी माहिती BSCER च्या समन्वयक समृद्धी पाचे यांनी दिली बीएस कौन्सील ऑफ एज्युकेशन अँड रिसर्चचे संचालक, मार्गदर्शक व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे मधील सल्लागार डॉ कुचेकर यांनी प्राचार्य, प्राध्यापक व सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.