*सर्वसामान्य लोकांच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठ्या मतांनी विजयी करा- डॉ बाबासाहेब देशमुख*

माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ दि ०३ मे रोजी सकाळी खवासपुर गावातील मुख्य चौकात कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी बोलताना डॉ बाबासाहेब देशमुख यांनी देशातील सत्तेत असलेले सरकार सर्वसामान्य माणसाच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उदासीन असल्याचे सांगितले तसेच आज कोणत्याही माणसाला कृषी मंत्री कोण आहे हे देखील माहिती नाही कृषीमंत्री शरद पवार असताना विविध योजना राबविण्यात आल्या डाळिंबाला तेल्या आता तर अनुदान व ईतर उपाययोजना केल्या परंतु सध्या संपूर्ण डाळिंब विविध रोगानी उध्वस्त होत असताना लोकप्रतिनिधी कडून दुर्लक्ष केले जात आहे गोरगरिबांना रेशन व इतर मुलभूत सुविधा मिळत नाहीत या भागातील सर्व पाणी योजना स्व आबासाहेब यांनी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने पुर्णत्वास आणल्या आहेत विठलापुर मार्गे खवासपुर बंधाऱ्याच्या खाली पाणी येत आहे परंतु चार किलोमीटर अंतरावर दिघंची मार्गे खवासपुर बंधाऱ्यात पाणी विद्यमान आमदार व खासदार आणु शकत नाहीत हे या भागात शेतकऱ्यांच दुर्देव आहे दुध दर,बेरोजगारी, महागाई यावर सत्ताधारी बोलत नाहीत हि निवडणूक जनतेने हातात घेतली आहे तरी सर्वांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता स्वाभिमानाने धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठ्या मतांनी विजयी करावे असे आवाहन केले
यावेळी कॉग्रेसचे जेष्ठ नेते झपके सर यांनी बोलताना सांगितले की पंतप्रधान एका दिवसाआड महाराष्ट्रात सभा घेत आहेत दबावाखाली आणि पक्ष फोडूनही लोक नाकारणार हे सत्ताधारी नेत्यांनी ओळखले आहे मोदी साहेब पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पासून डॉ मनमोहनसिंग यांच्या वर बोलतात पण दहा वर्षे काय केले अच्छेदिन कुठं गेले दिलेली आश्वासने का पुर्ण केली नाहीत बेरोजगारी महागाई आणि देशाच्या वाढलेल्या कर्जावर हे बोलत नाहीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जाणिवपूर्वक दुर्लक्ष करून मोठ्या उद्योगपतिंना मोठ करण्यासाठी वेळोवेळी मदत केली जात आहे तरी आपल्या जवळचे हक्काचे आपले उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयासाठी सर्वांनी तुतारी हे चिन्ह घरात पोहोचवावे असे आवाहन केले यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष पाटील यांनी मनोगत व्यक्त केले
तसेच चिकमहुदचे युवा नेते संग्रामसिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यमान आमदार व खासदार विकासाच्या खोट्या घोषणा करत असुन वास्तव वेगळे आहे तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी व लोकशाहीच्या रक्षणासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड शिवसेना नेते तुषार इंगळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान पाटील,मा पं.स. सदस्य भारत भोसले, मा उपसरपंच नंदकुमार यादव, चेअरमन माणिक जरे, नागनाथ जरे, मेजर भानुदास जरे,विष्णू जरे, मा सरपंच हरिदास फुले नितीन जरे, दादासाहेब भोसले, विठ्ठल फुले,लोकनियुक्त सरपंच गणेश दिक्षित, उपसरपंच नामदेव यादव, ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब भोसले,भारत जरे,पोपट जरे, नानासाहेब भोसले,गणेश बोडरे,संजय गवळी, पाणी पुरवठा समिती अध्यक्ष नरेंद्र जरे, भोसले सर, अजित ऐवळे, प्रकाश भोसले,वैभव ढेरे, सोसायटी संचालक प्रविण जरे,सोमनाथ भोसले,अंकुश यादव,उध्दव ढेरे, निलेश भोसले,दादासाहेब ढेरे,गुलाब बागल, मधुकर पाटील, रणजित जरे-पाटील, बापुराव यादव, अक्षय यादव, निरंजन ऐवळे,शंकर बागल,तंटामुक्त समिती अध्यक्ष दिलीप जरे, नामदेव गायकवाड, योगेश यादव , नामदेव यादव, अरविंद यादव,सिद्धेश्वर यादव, आप्पासाहेब जरे,फुले साहेब, रामचंद्र एवळे सर, जगन्नाथ पाटील,प्रकाश जरे,प्रकाश भोसले साहेब, मिथुन फुले, नेताजी भोसले, अशोक जरे,मोहन जरे, सदाशिव यादव,जालिंदर बोडरे, पितांबर बोडरे , महादेव जरे,एकनाथ एवळे,सुभाष भोसले, पप्पू जरे, सतिश ढेरे,अजय मोरे, संदिप ढेरे,बाळासाहेब भोसले,माणिक भोसले, यांच्या सह महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते व नागरिक उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने उपस्थित होते कॉर्नर सभेचे प्रस्तावित व आभार मधुकर ढेरे यांनी मानले