महाविकास आघाडीकडून होम टू होम प्रचाराची सांगोला शहरात धुमधडाक्यात सुरुवात; मा.धैर्यशिल मोहिते-पाटील यांचा जोरदार प्रचार; उस्फुर्त प्रतिसाद

सांगोला(प्रतिनिधी):- माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार मा.धैर्यशिल मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला शहरात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितित होम टू होम प्रचारची सुरुवात सांगोल्याचे ग्रामदैवत अंबिकादेवी मंदिरात नारळ फोडून करण्यात आली. महाविकास आघाडीमधील सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी होम टू होम प्रचार करीत मा.धैर्यशिल मोहिते-पाटील यांना निवडून आणण्यासाठी तुतारी वाजविणारा माणूस चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रचारकांनी केले आहे. दरम्यान शहरातील सर्व महापुरुषांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी डॉ.बाबासाहेब देशमुख, प्रा.प्रबुध्दचंद्र झपके, सौ.जयमालाताई गायकवाड, इंजि.रमेश जाधव, बाबुराव खंदारे, राजकुमार पवार, राजू मगर, अॅड.भारत बनकर, तोहीद मुल्ला, दिपक चोथे, इंजि.मधुकर कांबळे, प्रदिप मिसाळ, बाळासाहेब झपके, अवि देशमुख, बाळासाहेब शिंदे, तुषार इंगळे, इरशाद बागवान, सौ.स्वाती मगर, मिनाक्षी येडगे, दादा खडतरे, अवधूत सपाटे, किशोर बनसोडे, दिपक बनसोडे, सचिन खंदारे, दत्ता नलवडे, आकाश व्हटे, सुशांत येडगे, दत्ता टापरे, संतोष गुळमिरे, म्हाळाप्पा शिंगाडे, सुरेश पारसे, दत्तात्रय देशमुख, तानाजी भोकरे, महेश महामुनी, मोहसीन तांबोळी यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रचारकांनी नागरिकांना, व्यापारी बांधवांना धैर्यशील मोहिते पाटील यांच्या कामांची माहिती देत असून मा.धैर्यशिल मोहिते-पाटील यांचे तुतारी वाजविणारा माणूस चिन्ह आहे. त्यावर मतदान करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. या प्रचारामध्ये तरुणांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.