जि. प.करलवस्ती (कडलास)शाळेतील स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आपुलकी मित्र मंडळ कडलास यांचे वतीने सत्कार संपन्न*

सांगोला(प्रतिनिधी) १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित साधून जि. प.प्रा.शाळा करल वस्ती (कडलास) येथील अक्षरगंगा, मंथन या स्पर्धा परीक्षेत राज्यस्तरीय यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आपुलकी मित्र मंडळ कडलास (इयत्ता दहावी सन 1981 ची बॅच) यांचे मार्फत सत्कार करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष कुमार निंबाळकर यांनी शाळेत राबवलेले विविध उपक्रम, स्पर्धा परीक्षेतील उल्लेखनीय यश, शालेय यशोगाथा याबाबत माहिती दिली.
अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम आलेल्या इयत्ता दुसरीतील कु.स्वानंदी स्वप्निल शिंदे (150 पैकी 150 गुण )हिचा व पालकांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.त्यानंतर कु.आरोही नवनाथ सावंत (राज्यात चौथी) कु.स्वाती सुधीर गायकवाड (राज्यात पाचवी) स्वराज विनायक गायकवाड (जिल्ह्यात तिसरा) कु.वेदिका विनायक गायकवाड (केंद्रात प्रथम)अथर्व सचिन पवार (केंद्रात प्रथम) आदित्य दीपक मोहिते (केंद्रात द्वितीय) कु.अदिरा अनमोल मोहिते (केंद्रात तृतीय) ओम महेश गायकवाड, कु.जान्हवी दीपक यादव,या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प, शैक्षणिक साहित्य देऊन गुण गौरव करण्यात आला.मार्गदर्शक शिक्षक श्री संतोष कुमार निंबाळकर व श्री अनिल शिंदे यांचा आपुलकी मित्र मंडळ यांचे वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. आपल्या मनोगतात श्री प्रोफेसर केशव लिगाडे यांनी ग्रामीण भागातील, वाडी वस्तीवरील शाळेचे उल्लेखनीय यशाचे कौतुक करून मुलांना, पालकांना मार्गदर्शन केले.
श्री रामदास माने सर, श्री बबन गायकवाड सर, श्री शहाजी पाटील सर ,यांनी शाळेत राबवलेले विविध उपक्रमाचे विशेष कौतुक करून आपल्या शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या. इयत्ता तिसरीतील अथर्व सचिन पवार याने हार्मोनियम पेटी वाजवून सर्वांना मंत्रमुग्ध केले.त्याला सर्वांनी रोख बक्षीस देऊन त्याचे अभिनंदन केले.आपुलकी मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी भविष्यात असेच यश संपादन करून कडलासचे नाव राज्यात चमकावे अशा शुभेच्छा देऊन शाळेस आवश्यक असणाऱ्या मदतीस सदैव तयार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आभार सहशिक्षक श्री अनिल शिंदे यांनी मानले.
सदरहू कार्यक्रमासाठी आपुलकी मित्रमंडळाचे सदस्य श्री विश्वनाथ शिंदे, श्री अशोक महांकाल,श्री केशव लिगाडे,श्री माने सर, डॉक्टर विलास इंगळे, श्री बबन गायकवाड सर, जे.एन.गायकवाड, श्री शहाजी पाटील सर आनंदराव गायकवाड, श्री पोपट जाधव,श्री पोपट काशीद, श्री दिलीप जाधव,बालवाडी शिक्षिका ठोकळे मॅडम, यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष स्वप्निल शिंदे, उपाध्यक्ष महेश गायकवाड ,श्री सचिन पवार ,श्री दीपक मोहिते, श्री योगेश मोहिते ,श्री अनमोल मोहिते, सुधीर गायकवाड ,दत्तात्रय वाघ, नवनाथ सावंत, यादव नाना ,बहुसंख्य महिला भगिनी पालक उपस्थित होते.