संविधान हीच भारतीय समाजाच्या विकासाची गुरुकिल्ली- तानाजी सूर्यगंध सर

शनिवार दिनांक 20 .7 .2024 रोजी नाझरा विद्यामंदिर प्रशाला येथे ‘संविधानाचा जागर ‘हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेजचे पर्यवेक्षक तानाजी सूर्यगंध सर संविधाना विषयी माहिती देत असताना असे म्हणाले की 26 जानेवारी 1950 हा दिवस दीपावली पेक्षा, रमजान ईद पेक्षा आणि ख्रिसमस पेक्षा मोठा सण आहे. दीपावलीला फक्त हिंदू लोकच हा सण साजरा करतात. रमजान ईदला मुस्लिम लोकच हा सण साजरा करतात. ख्रिसमस ला ख्रिश्चन लोकच हा सण साजरा करतात.
मात्र 26 जानेवारी 1950 या दिवशी देशातील सर्व धर्मीय लोकांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळाले म्हणून भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्यामुळे ज्या दिवशी संविधान लागू झाले तो दिवस म्हणजे 26 जानेवारी या दिवशी जनतेला जे कधीच नव्हते ते अधिकार आणि हक्क मिळाले म्हणून तो दिवस भारतातील सर्व धर्मीयांनी नाचून, गाऊन, फटाके फोडून, नवीन कपडे घालून हा राष्ट्रीय उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला पाहिजे याविषयी सांगत असताना सूर्य गंध सर यांनी संविधानातील 1 ते 85 कलमांचे स्पष्टीकरण केले यामुळे शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्यामध्ये संविधानाविषयी जागृती निर्माण झाली
या कार्यक्रमासाठी नाझरा विद्यामंदिर प्रशालेचे प्राचार्य माने सर. पर्यवेक्षक धायगुडेसर, शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.