सांगोला:-सांगोला शहरातील महूद रोड येथील गणपती मंदिराचे विश्वस्त व सांगोला तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचे संस्थापक कृष्णाजी यशवंत इंगोले यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 81 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कृष्णाजी इंगोले यांनी ज्येष्ठ नागरिक संघटनेची स्थापना करून वेगवेगळे उपक्रम राबवले. सांगोला येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये कृष्णाजी इंगोले लाईनमन पदावर काम करीत होते. ते 2002 साली सेवानिवृत्ती झाले होते. 1993 साली त्यांनी सांगोला महुद रोड श्री गणेश मंदिराची स्थापना करून त्यांनी संपूर्ण आयुष्य धार्मिक क्षेत्राकडे वळवून पूजाअर्चा करण्याचे काम केले.
गोरगरिबांना सल्ला व मदत केंद्र म्हणून त्यांचे मंदिर प्रसिद्ध आहे. ज्येष्ठ नागरिक महिला नागरिकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात ते सतत मग्न होते. दानशूर वृत्तीचे असल्याने व त्यांचा स्वभाव मनमिळाऊ व प्रेमळ असल्याने संपूर्ण सांगोला शहरात अण्णा या टोपण नावाने प्रसिद्ध होते. त्यांच्यावर सांगोला येथील वाढेेगांव रोडवरील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या तिसर्या दिवसाचा विधी शुक्रवार दिनांक 27 रोजी सकाळी 7ः30 वाजता होणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.