सेंद्रिय शेती मानवी जीवनाचे आयुष्यमान वाढवते- यल्लाप्पा झुंजुरु

सांगोला ( उत्तम चौगुले) :- माजी सैनिक कल्याणकारी संस्था सांगोला यांचे वतीने हॉटेल फाईव्ह स्टार येथे वेंकटेश्वरा ऍग्रो अँड पावर प्रोसेसिंग युनिट. ह्या सेवाभावी संस्थेची आजी – माजी सैनिक , विरपत्नी, विर माता – पिता तसेच शेतकरी बांधव यांची आधुनिक पद्धतीची सेंद्रिय शेती, शेती पूरक व्यवसाय, सांघिक शेती इतर अनेक विषयांवर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.
सदर कार्यशाळेची सुरुवात सरस्वती देवीचे पूजन व दीप प्रज्वलन करून झाली. अनमोल मार्गदर्शन करण्यासाठी मा.श्री यल्लपा झंगरू साहेब (बेळगाव) व श्री.विनोद गंभीरे (कोल्हापूर) येथून आले होते. मा.श्री.यल्लपा झंगरूचे (बेळगाव) यांनी आपले विचार सांगताना सांगितले की भारताचे पाहिले पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान-जय किसान ची संकल्पना देशासमोर ठेवली होती त्या विचारातून प्रेरित होऊन आपल्या संस्थेचे चेअरमन मा.डॉ. शिवाजीराव डोळे साहेब,माजी सैनिक (ब्लॅक कॅट कमांडो) गेल्या फक्त चार वर्षात एक लाखाहून अधिक सैनिक व शेतकऱ्यांना एकत्रित करून अजंग वडेल , मालेगाव (नाशिक) येथे 528 एक्कर जमिनीवर नंदनवन फुलवले आहे. तसेच आपल्या संस्थेची बेळगावी (कर्नाटक) येथे उत्पादन क्षमता 30 टन असणारी काजू फॅक्टरी सहकाराच्या माध्यातून कार्यरत आहे. तसेच पुढील वर्षी म्हणजे वर्ष 2025 मध्ये ही संस्था महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात स्वस्त व दर्जेदार बियाणे, खत तसेच औषधे विक्रीचे शेतकऱ्यासाठी कृषी सेवा केंद्र पण उभा करणार आहोत.
तसेच कार्यशाळेला संभोदीत करतांना मा.श्री. विनोद गंभीरे (कोल्हापूर) म्हणाले की, संस्थेच्या माध्यमातुन भविष्यात माजी सैनिक व सुशिक्षित नवतरुण व तरुणींना नौकरी, व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध “वेंकटेश्वरा कोरोडोर” च्या माध्यमातुन करणार आहोत. तसेच शेतकर्यान शेती साठी बि बियाणे, खत, औषधे त्याचबरोबर शेतीचे व्यवस्थापन कसे करावे यांचे पण मार्गदर्शन संस्था करणार आहे. आपल्याला संस्थेच्या माध्यमातू शेतमालाला योग्य व चांगला बाजार भाव मिळण्यासाठी ही संस्था स्वतः मार्केटिंग करून शेती व्यवसाय करण्यास प्रवृत्त करून राज्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याचे काम संस्था करत आहे.
सदर कार्यक्रमात बोलताना मा.इंजि. नरेश बाबर यांनी तालुक्यातील सर्व आजी माजी सैनिक व शेतकरी बांधवांना वेंकटेश्वरा पॉवर अँड ऍग्रो प्रोसेसिंग लि. संस्थेचे सह भागिदार होण्यासाठी ₹ 100 /- सभासद बनण्याचे आवाहन केले. पुढे ते म्हणाले की ₹ 1000/- शेअर्स विक्री सुरू आहे.अधिक माहितीसाठी इंजिनीयर नरेश बाबर (8530001455) आणि व्यंकटेश्वरा अग्रो पॉवर अंड प्रोसेसिंग युनिट सांगोला विभाग चे सदस्याशी संपर्क करावा.
सदर कार्यशाळेसाठी तालुक्यातील विविध सैनिक,सेवाभावी संस्था,शेतकरी संघटनाचें पदाधिकारी उपस्थित होते. तसेच सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, जत, कवठेमहांकाळ , आटपाडी,बार्शी तालुक्यातील अनेक सैनिक व शेतकरी बंधु उपस्थित होते.ह्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी इंजि.नरेश बाबर श्री.शहाजी कापणे,श्री.रविंद्र मारळ,श्री.रेवणसिद्ध पाटील,सौ.स्वाती पाटील व सौ.संगीता चौगुले. तसेच सर्व सल्लागार यांचे सहकार्य लाभले. शेवटी श्री. उत्तम चौगुले यांनी आभार प्रदर्शन करून एकदिवसीय कार्यशाळेची सांगता केली.



