खते व बियाणे यांचा तुटवडा जाणवणार नाही यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील-तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे

सांगोला : खते व कृषी निविष्ठा यांचे गैख्यवहार रोखता यावेत, शेतकऱ्यांचे होणारे  नुकसान टाळता यावे, सर्व प्रकारचे बियाणे शेतकऱ्यांना योग्य भावात मिळावेत तसेच खतांचा मुबलक साठा व त्याचे योग्यवितरण व्हावे यासाठी सांगोला तालुक्यात भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. खते व बियाणे यांचा तुटवडा जाणवणार नाही यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली आहे.
जून ते आज अखेरपर्यंत १६२.९ मि.ली मीटर पावसाची नोंद झाली आहे. २७ हजार १७५ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरणीचे नियोजन केले आहे. विशिष्ट कंपन्यांच्या बियाणांची मागणी केली जाणे, साठेबाजी याबाबतच्या उपाययोजना केल्या आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कापूस- सोयाबीन योजना व अन्य योजनांच्या तसेच सांगोला महाबीजच्या माध्यमातून खरीप हंगामासाठी आवश्यक बी-बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात आली आहेत, कुठेही त्याची टंचाई भासणार नाही, असे नियोजन करण्यात येत आहे.
 कृषी निविष्ठा दुकानांमधून चढया भावाने केली जाणारी विक्री, कृत्रिम टंचाई, बोगस बियाणे विक्री याबाबत विभागाककडून ‘धडक कारवाई केली जाणार आहे. सांगोला तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे शेतकरी वाफसा येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पेरणीसाठी पुरेशा प्रमाणात बियाणे व  खते उपलब्ध करून दिले आहेत. शेतकऱ्यांनी अधिकृत दुकानदारांकडून बियाणे व खते खरेदी करावीत. शेतकऱ्यांनी बियाणे व खते खरेदी करताना बिलाची पक्की पावती बॅगवरील एमआरपीपेक्षा जास्त पैसे देऊ नयेत. यासंदर्भात कोणतीही अडचण आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
खते व वियाणे बियाणांचा साठा, जादा दराने किक्री होऊ नये म्हणून भरारी पथकाची नेमणूक केली आहे. या भरारी पथकामध्ये कृषीविभाग व पंचायत समितीचे कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी व वन परिक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे.
खरीप हंगामात २७ हजार १७५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे. त्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे मका १७हजार ५०० हेक्टर, बाजरी १५ हजार हेक्टर, तूर १२५० हेक्टर, गह ५०० हेक्टर, उडीद ७५० हेक्टर, सृर्यफुल दोन हजार हेक्टर, सोयाबीन १०० हैक्टर, भुईमूग ५०० हेक्टर, कापूस २५० हेक्टर, मटकी १२५ हेकटर क्षेत्रावर  पेरणी होईल अशी अपेक्षा आहे.
खरीप हंगामात पेरणीसाठी एकूण चार हजार ७१६ क्विंटल बियाणे लागणार आह. यामध्ये बाजरी ६00 क्विंटल, मका सहा हजार ५०० क्विंटल, तूर ५५ क्विंटल, मूग ५८ क्विंटल, उडीद ३९ क्विंटल, सूर्यफुल २०० क्विंटल, सोयाबीन २६ क्विंटल, भुईमग २६५ क्विंटल बियाणे मार्केटमध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत -शिवाजी शिंदे, तालुका कृषी अधिकारी, सांगोला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button