महाराष्ट्र
सांगोला विद्यामंदिरमध्ये सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न

सांगोला ( प्रतिनिधी ) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील पर्यवेक्षक सुरेश मस्तुद,मच्छिंद्र इंगोले, सहशिक्षक मारुती बोरकर व मिलिंद फाळके यांचा सेवापूर्तीनिमित्त सपत्नीक सत्कार संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके व संस्था कार्यकारिणी सदस्या शीलाकाकी झपके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संस्था सचिव म.शं.घोंगडे,संस्था सदस्य चंद्रशेखर अंकलगी, सांगोला विद्यामंदिरचे प्राचार्य अमोल गायकवाड,नाझरा विद्यामंदिरचे प्राचार्य बिभीषण माने,कोळा विद्यामंदिरचे प्राचार्य श्रीकांत लांडगे,सांगोला विद्यामंदिर उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे ,पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, कोळा विद्यामंदिरचे पर्यवेक्षक चारुदत्त जगताप व सत्कारमूर्ती सपत्नीक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थापक अध्यक्ष कै.गुरुवर्य चं वि. बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रात सर्व सत्कारमूर्तींचे हस्ते पुष्पहार समर्पित आला.
त्यानंतर सेवापूर्ती कार्यक्रमांमध्ये मकरंद अंकलगी,प्रा.गणेश घेरडीकर,उन्मेष आटपाडीकर,अमोल महिमकर, प्रा.धनाजी चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून सत्कारमूर्तींच्या विविध पैलूवर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याचा गौरव केला व सेवापूर्तीनिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्तींनी कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके, कै.बाईसाहेब झपके, संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके व झपके परिवाराविषयी कृतज्ञता व्यक्त करत,शाळा,संस्था यांच्या विषयी गौरवउद्गार काढले व सत्काराबद्दल धन्यवाद दिले. यावेळी नाझरा विद्यामंदिर नाझराकडून प्राचार्य बिभिषन माने यांनी सत्कारमूर्तींचा सत्कार केला.
या कार्यक्रमासाठी सत्कारमूर्तींचे कुटुंबीय व सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनानी झाली. कार्यक्रमाच्या प्रास्तविकामध्ये प्राचार्य अमोल गायकवाड यांनी कार्यक्रमाचा हेतू विषद करत उपस्थितांचे स्वागत केले व सर्व सत्कारमूर्तीं मला गुरुस्थानी आहेत असे सांगत त्यांच्या कार्याचे वेगळेपण सांगत व गौरव व्यक्त करत त्यांना सेवापूर्तीतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले तर उपमुख्याध्यापिका शहीदा सय्यद यानी आभार प्रदर्शन केले.
सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके व कै. बाईसाहेब झपके यांचे तत्व प्रमाण मानत संस्थेची वाटचाल सुरू आहे. संस्थेने नेहमीच गुणवत्तेला प्राधान्य दिलेले आहे. तसेच विद्यामंदिर हा शैक्षणिक परिवार नसून तो कौटुंबिक जिव्हाळा जपणारा परिवार आहे.त्यामुळेच असे कार्यक्रम होतात.आपण या कार्यक्रमातून सत्कारमूर्तींच्या कार्याचा चांगला पैलू अंगीकारावा व विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून गुणवत्तेला प्राधान्य देत आपल्या कार्यातून आदर निर्माण करावा..
प्रा.प्रबुद्धचंद्र झपके
अध्यक्ष,सां.ता.शि.प्र.मंडळ, सांगोला



