सांगोला विद्यामंदिर परिवाराकडून जि.प.प्रा. शाळा, इंगोलेवस्ती (खारवटवाडी) यांना कपाट भेट

सांगोला (वार्ताहर) सांगोला विद्यामंदिर परिवाराकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इंगोलेवस्ती (खारवटवाडी) यांना शाळेच्या गुणवत्तेतील सातत्याबद्दल संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर यांच्या शुभहस्ते कपाट भेट देण्यात आले.
या कार्यक्रमावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक अमोल गायकवाड सर, इंगोले वस्ती शाळेचे मुख्याध्यापक चतुरगुण औताडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान इंगोले व विद्यामंदिर परिवारातील प्रशासकीय वर्ग व सर्व शिक्षक उपस्थित होते.
कै.गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांनी आदर्श घालून दिलेल्या सांगोला विद्यामंदिर परिवारामध्ये ज्या पद्धतीने बाह्यपरीक्षा आणि वर्षभरातील उपक्रम राबवत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व सामाजिक विकासाचे काटेकोरपणे नियोजन केले जाते अगदी त्याच पद्धतीने जि.प.प्रा. इंगोलेवस्ती या शाळेतही असेच नियोजन वर्षभर चालू असते.
सन 2024-25 मध्ये मंथन स्पर्धा परीक्षा, आय एम विनर स्पर्धा परीक्षा, दिमाखदार वार्षिक स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहल, पालक सभा हे उपक्रम जि.प.प्रा.शाळा, इंगोलेवस्ती येथे राबविण्यात आले.
यासाठी इंगोले वस्ती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान इंगोले, त्यांचे सहकारी आणि या शाळेचा सर्व स्टाफचे अभिनंदन करत सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके साहेब यांच्या संकल्पनेतून इंगोले वस्ती शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांच्या कामाची पोचपावती म्हणून ही विद्यार्थी उपयोगी वस्तू शाळेस भेट म्हणून देण्यात आली.
आजच्या शैक्षणिक स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातून सुद्धा हे सर्व विद्यार्थी गुणवत्ता सिद्ध करू शकतात हे इंगोले वस्ती या शाळेने दाखवून दिले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठीच विद्यामंदिर परिवाराकडून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. निकोप स्पर्धेतून विद्यार्थ्यांचा विकास व्हावा. शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन व पुढील कार्यास सदिच्छा.
____ संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर
सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, सांगोला विद्यामंदिर प्रशाला या नामांकित, बाह्य परीक्षेत अविरतपणे विद्यार्थी घडवणाऱ्या संस्थेकडून व शाळेकडून आमच्या शाळेच्या गुणवत्तेबद्दल जो सन्मान करण्यात आला त्याबद्दल आम्ही विद्यामंदिर परिवाराचे ऋणी आहोत. या सत्कारामुळे आमची जबाबदारी वाढली असून येणाऱ्या काळातही विद्यार्थी विकासासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याची प्रेरणा या उपक्रमातून आमच्यामध्ये निर्माण झाली आहे.
_____ चतुरगुण औताडे सर
( जि.प.प्रा.शाळा इंगोले वस्ती
, खारवटवाडी )



