सांगोला लायन्स क्लबकडून गुरुजनांच्या आरोग्याची काळजी; गुरुपौर्णिमेनिमित्त रक्तदाब व रक्तशर्करा मोफत तपासणी शिबिर

सांगोला ( प्रतिनिधी) गुरूपौर्णिमेनिमित्त सांगोला लायन्स क्लबने गुरुजनांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण व रक्तदाब तपासणी व आरोग्य सल्ला शिबीर घेत अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.
माजी प्रांतपाल ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे मार्गदर्शनाखाली लायन्स क्लब सांगोला व डोंबे हॉस्पिटल यांच्या वतीने सांगोला येथे १०० पेक्षा जास्त गुरुजनांची रक्त शर्करा व रक्तदाब तपासणी करण्यात येऊन गुरुजनांना आवश्यक वैद्यकीय सल्ला देण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर माजी प्रांतपाल ३२३४ड१माजी प्रांतपाल ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, डोंबे हॉस्पिटलच्या डॉ.सौ.जीवनमुक्ती डोंबे, सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष उन्मेष आटपाडीकर, खजिनदार नरेंद्र होनराव, सांगोला विद्यामंदिरचे प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अमोल गायकवाड उपमुख्याध्यापक शहिदा सय्यद उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे उपस्थित होते.
या शिबिरासाठी कॅबिनेट ऑफिसर ला. प्रा.धनाजी चव्हाण, सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, प्रदीप धुकटे, मच्छिंद्र इंगोले ,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, लायन्स क्लब ऑफ सांगोला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार अध्यक्ष उन्मेश आटपाडीकर यांनी केले
लायन्स क्लब ऑफ सांगोला व डोंबे हॉस्पिटल सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजनांच्या आरोग्यासाठी घेतलेला उपक्रम महत्त्वपूर्ण आहे.या शिबिरातून शिक्षकांना साखरेच्या आजाराविषयी माहिती होईल तसेच आजाराचे स्वरूप गंभीर होऊ नये यासाठी वेळीच उपाययोजना करता येईल.
*डॉ. सौ.जीवनमुक्ती डोंबे*
डोंबे हॉस्पिटल सांगोला