वाहनधारकांनो सावधान! विंडशील्डवर फास्ट टॅग नसल्यास भरावा तब्बल दंड, काय आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा नवा नियम ?
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) नवा नियम बनवला आहे. या नव्या नियमानुसार, जे वाहनचालक वाहनाच्या समोरच्या विंडशील्डला फास्ट टॅग जोडत नाहीत, त्यांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून लागू करण्यात आलेल्या नव्या नियमानुसार, वाहनाच्या समोरच्या विंडशील्डला फास्ट टॅग जोडणे बंधनकारक आहे. ज्या वाहनांवर फास्ट टॅग नसेल अशा वाहनांचे वाहन नोंदणी क्रमांक रेकॉर्ड करण्यासाठी टोल प्लाझाकडून CCTV चा वापर योग्य प्रकारे करण्यात येणार आहे.
प्रवासादरम्यान टोल भरण्यास टाळाटाळ करू नये, पेसे देताना वेळ वाया जाऊ नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. थकबाकीदारांना काळ्या यादीतही टाकले जाऊ शकते, असे एनएचएआयने म्हटले आहे.