न्यू इंग्लिश स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल सांगोला मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. सदरचा कार्यक्रम इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांनी आयोजित केला होता.कार्यक्रमाच्या प्रारंभी महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि कॅालेजचे प्राचार्य प्रा.केशव माने यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक व पूर्व प्राथमिकचे मुख्याध्यापक दिनेश शिंदे सर, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि कॅालेजचे उपप्राचार्य प्रा.संतोष जाधव, न्यू इंग्लिश स्कूलचे उपमुख्याध्यापक प्रा.संजय शिंगाडे,पर्यवेक्षक तानाजी सूर्यगंध सर,दशरथ जाधव सर,तात्यासाहेब इमडे सर,सांस्कृतिक विभाग प्रमुख स्मिता इंगोले मॅडम, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रशालेतील सर्व प्रशासकीय अधिकारी,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान इयत्ता १० वी तील विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला.
सुरूवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना इयत्ता १० वी तील सानवी सुरेश गाडेकर हीने आयुष्यातील गुरूंचे महत्व आधोरेखित केले. यानंतर वैष्णवी दिपक माने,श्रावणी विष्णू माळी,प्रगती चंद्रकांत पाटील,गीता गणेश शिनगारे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पर्यवेक्षक तानाजी सूर्यगंध सर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गुरु हा केवळ शिक्षकापेक्षा अधिक असतो; ते प्रेरणा आणि शहाणपणाचे झरे आहेत. ते आपली क्षितिजे विस्तृत करतात, आपल्या विचारांना आकार देतात आणि आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यास प्रोत्साहित करतात. त्यांचा प्रभाव वर्गाच्या पलीकडे पसरलेला आहे.
सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी विष्णू माळी या विद्यार्थीनीने केले तर आभार इयत्ता १० वी तील आदित्य विकास शिंदे याने मानले.