माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानचे उत्कर्ष बालक मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा साजरी

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानचे उत्कर्ष बालक मंदिरामध्ये दि.२२/०७/२०२४ सोमवार रोजी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.
या गुरुपौर्णिमेच्या निमित्त माजी मुख्याध्यापिका मा.सुमन कांबळे मा. सुनीता कुलकर्णी व माजी शिक्षिका प्रतिभा खुळपे तसेच राजाक्का साळुंखे व सर्व बालक मंदिराच्या शिक्षिका यांच्या समवेत आनंदी व उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात गुरुर्ब्रह्मा या श्लोकाने झाली यानंतर सर्व माजी मुख्याध्यापिका व शिक्षिका यांना पुष्पगुच्छ व छोटी भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. नंतर सुमनताईंनी मुलांना गुरुपौर्णिमेची गोष्ट सांगितली तसेच सुनिता ताईंनी हिंदी अभिनय गीतांनी मुलांचे लक्ष वेधून घेतले प्रतिभाताईंनी वृक्षारोपणासाठी शाळेला रोप भेट म्हणून दिले. मुलांनी ताईंना फुले देऊन शुभेच्छा दिल्या अशाप्रकारे गुरुपौर्णिमा बालक मंदिरामध्ये गुरुमय वातावरणात संपन्न झाली..