*सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा कार्यक्रम*

गुरुपौर्णिमेच्या पावन प्रसंगी सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एक भव्य आणि प्रेरणादायक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या दिवशी विद्यालयाने महर्षी व्यास व सरस्वती पूजनाचे आयोजन करून शिक्षण आणि ज्ञानाच्या महत्वाला उजाळा दिला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या व्यवस्थापिका सौ.अनिता इंगवले मॅडम यांनी दीपप्रज्वलन करून केली. यानंतर सर्व उपस्थित शिक्षकांनी देवी सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली आणि तिच्या कृपेने ज्ञानाच्या आकाशात नवीन कक्षा गाठण्यासाठी प्रार्थना केली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना आणि गुरु वंदना गाण्याचे सुंदर सादरीकरण केले. यावेळी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः
यासारख्या मंत्रांचा उच्चार करून गुरूंच्या महत्वाचे वर्णन केले.
मुख्याध्यापिका सौ.प्रमोदिनी जाधव यांनीत्यांच्या भाषणात शिक्षणाचे महत्व आणि गुरु-शिष्य परंपरेवर प्रकाश टाकला. त्यांनी शिक्षणाच्या
क्षेत्रात कसे प्रगती करता येईल यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेमार्फत सर्व शिक्षकांना श्रीफळ , भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन
सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत खुमासदार पद्धतीने, प्रत्येक शिक्षकांसाठी स्वतः भेटकार्ड व चारोळ्या तयार करून केले.
कार्यक्रमाला विशेष परिश्रम सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. शोभा मोरे ,दहावीच्या वर्ग शिक्षिका सौ. प्रतिभा पाटील व सौ. सुरेखा स्वामी मॅडम यांनी घेतले या प्रसंगी उपस्थित असलेल्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे हा कार्यक्रम पार पाडला.