जवळे येथे गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा.

जवळे(प्रशांत चव्हाण) मौजे जवळे तालुका सांगोला येथील श्री. सद्गुरु कचरनाथ बाबा यांच्या दरबारामध्ये रविवार दि 21 जुलै 2024 रोजी मोठ्या भक्ती भावाने,आनंदात गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला.
सदरप्रसंगी श्री.सद्गुरु कचरनाथ बाबांचे वेळापूर,डफळापूर जवळे दरबारातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भजन,प्रवचन,स्रोत वाचन व सामुदायिक जप करून संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी पुष्पवृष्टी होऊन श्री ची आरती झाली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होऊन प्रत्येकाला घरी नेण्यासाठी प्रसाद व विभूती देण्यात आली.
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.चंद्रकांत देशमुख गुरुजी श्री.बसवेश्वर गयाळी,श्री.पांडुरंग चव्हाण,श्री.बंडू सुतार यांनी परिश्रम घेतले.