जो जो जयाचा घेतला मी गुण तो तो मी केला असे गुरू जाण – सुनील लिगाडे

श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर धायटी प्रशालेमध्ये आज सोमवार दिनांक २२ जुलै २०२४ रोजी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. सुनील लिगाडे सर होते.सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सुरूवातीला प्रशालेतील काही विद्यार्थी – विद्यार्थिनींनी गुरूविषयी आपले मनोगत व्यक्त केले.तद्नंतर प्रशालेतील शिक्षक श्री.केशव मोरे सर , श्री.बजरंग भोसले सर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सुनील लिगाडे सर यांनी मनोगत व्यक्त करताना एकलव्याची गोष्ट विद्यार्थ्यांना सांगून गुरूप्रेम कसे असावे, गुरुविषयी कृतज्ञता कशी व्यक्त करावी याविषयी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.विजयकुमार जगताप सर, सर्व शिक्षक – शिक्षिका, शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री.रामभाऊ वाघमोडे सर यांनी केले तर आभार श्रीमती सुनीता चव्हाण मॅडम यांनी मानले.