सिंहगड पब्लिक स्कूल कमलापूर येथे शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन

शिक्षण ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. आज शिक्षकांनी सतत बदलत असलेल्या लँडस्केपचा सामना करण्यासाठी स्वत:ला विकसित करणे आवश्यक आहे. म्हणून सिंहगड पब्लिक स्कूल कमलापूर यांनी एक दिवशीय शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते.योग्य ज्ञान आणि कौशल्यासह शिक्षकाने अलीकडील घडामोडींसह अद्ययावत असणे
आवश्यक आहे. त्यासाठी अध्यापनशास्त्रावरील नियमित प्रशिक्षण सत्रे महत्त्वपूर्ण आहेत,यावेळी एकविसाव्या शतकातील कौशल्य या विषयावर हे प्रशिक्षण घेण्यात आले.
या प्रशिक्षणासाठी मुख्यमार्गदर्शक म्हणून सीबीएसईच्या जिल्हा समन्वयक व सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टीच्या प्राचार्या स्मिता नवले मॅडम यांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन कॅम्पस डायरेक्टर मा.अशोक नवले सर, मार्गदर्शक प्राचार्या स्मिता नवले मॅडम, शाळेच्या प्राचार्या चैताली मराठे मॅडम उप प्राचार्य श्री.रमेश कट्टाचारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करूनकरण्यात आले.
यावेळी 21व्या शतकातील कौशल्य याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बोलताना मार्गदर्शक म्हणाल्या की
एक चांगला संभाषण करणारा एक प्रभावी शिक्षक असतो आणि तो विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास सक्षम करतो तसेच इतर मुद्द्यांमध्ये नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचे ज्ञान, परस्परसंवादी मूल्यमापन आणि सकारात्मक शैक्षणिक वातावरण तयार करण्यासाठी वर्गात विविध अध्यापन पद्धतीचा वापर याविषयी चर्चा झाली.
यामध्ये विविध ऍक्टिव्हिटी घेऊन हे प्रशिक्षण शिबिर आनंददायी शिक्षणाकडे कसे घेऊन जाता येईल याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी शिक्षकांसाठी फनी गेम्स चेही आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी सिंहगड पब्लिक स्कूल सोलापूर तसेच सिंहगड पब्लिक स्कूल कमलापुर येथील 70 शिक्षकांनी सहभाग नोंदविला. यावेळी बोलताना शाळेच्या प्राचार्या चैताली मराठे मॅडम यांनी मार्गदर्शकांचे तसेच शाळा व्यवस्थापनाचे अल्पवधीत या प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका चव्हाण मॅडम यांनी केले.हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी योगदान दिले