आनंद विद्यालय मध्ये गुरुपौर्णिमा साजरी
सोमवार दिनांक 2207/2024 रोजी प्रशालेमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री बनकर एम एच हे होते व सर्व शिक्षक हजर होत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या विद्यार्थिनी श्रेया पिसे व ज्ञानेश्वरी देवकते यांनी सर्व शिक्षकांचे स्वागत केले व या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेची विद्यार्थिनी विद्या आदलिंगे यांनी केले प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचे गुलाबाच फुल आणि पेन देऊन सत्कार करण्यात आले
या कार्यक्रमांमध्ये प्रशालेची विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगत मध्ये शिक्षकाचे स्थान आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे व शिक्षक आपल्याला घडवण्याचं काम करतात व योग्य मार्ग दाखवतात म्हणून गुरुचे स्थान आपल्या जीवनामध्ये सर्वोच्च आहे आमच्या प्रशालेचे सहशिक्षक श्री बाबर यांनी आपल्या मनोगत मध्ये गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा असेही म्हणतात, कारण या दिवशी त्यांचा जन्म झाला होता. गुरुपौर्णिमेचे महत्त्व गुरु आणि शिष्य यांच्या पवित्र नात्याचे प्रतीक आहे. या दिवशी शिष्य त्यांच्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांच्या ज्ञान आणि मार्गदर्शनाबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करतात. सौ सुवर्ण नवले सौ गाडेकर मॅडम
यांनी सर्व शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे आभार प्रशालेची विद्यार्थिनी अंकिता चोरमले यांनी मांडले