पवित्र हज यात्रापूर्ती स्वागत समारंभात सय्यद दाम्पत्याचा सत्कार

सांगोला- शहरातील सांगोला विद्यामंदिर प्रशालेतिल सेवानिवृत्त उपमुख्यध्यापक अब्दुलगनी ऊर्फ सत्तार सय्यद व त्यांच्या बेगम सायराबानो सय्यद हे दोघेही खडतर अशा पवित्र हज यात्रेस जावुन नुकतेच सान्गोला येथे परतले आहेत.त्या प्रित्यर्थ त्यांच्या परिवाराने स्वागत समारंभ आयोजित केला होता.सांगोला शहरातील वाढेगाव रोडवरील बंधन कार्यलयात सदर कार्यक्रम संपन्न झाला.
या वेळी सय्यद दाम्पत्यांचा मित्र मन्डळी तर्फे सत्कार करण्यात आला.या प्रसंगी सेवानिवृत्त मित्र मन्डळी मधील संजीव नाकिल,बजरंग लिगाडे,राजकुमार पतंगे,भिमाशंकर पैलवान,नारायण विसापुरे,सुभाष महिमकर,तायाप्पा आदट,दामोदर नागणे,बबन बुंजकर,शिवाजीराव बनसोडे,अमर गुळमिरे,सुधाकर म्हेत्रे,भाऊसाहेब पवार,राजाभाऊ ठोंबरे,शंकर डोंबे,बाळासाहेब कळमणकर,अनिल कुलकर्णी ,पांडुरंग भुइटे,लक्ष्मण जान्गळे,रफिक मणेरी आदि उपस्थित होते.



