दोन्हीकडे भाजप सरकार, मग आरक्षणाचा प्रश्न का सोडवत नाही? खासदार प्रणिती शिंदेंचा संसदेत सवाल

महाराष्ट्रात सरकार तणाव वाढवत असल्याचा आरोपही खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. संसदेमध्ये आज प्रणिती शिंदे यांनी शून्य प्रहरामध्ये मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला.
राज्यात आणि केंद्रात भाजप सरकार असतानाही महाराष्ट्रात आरक्षणाच्या प्रश्नावर कोणताही तोडगा का काढला जात नाही? असा सवाल खासदार प्रणिती शिंदे यांनी आज संसदेत केला. महाराष्ट्रात सरकार तणाव वाढवत असल्याचा आरोपही खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. संसदेमध्ये आज प्रणिती शिंदे यांनी शून्य प्रहरामध्ये मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच मनोज जरांगे पाटील करत असलेल्या आमरण उपोषणाकडे लक्ष वेधले.
प्रणिती शिंदे म्हणाल्या की, राज्यात आणि केंद्रामध्ये भाजप सरकार असतानाही कोणताही तोडगा का काढला जात नाही. महिला आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली. दरम्यान, राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये जातनिहाय आरक्षणाची घोषणा केली होती. त्याची आठवण करून देत खासदार प्रणिती शिंदे यांनी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली.