सोलापूर जिल्हा प्राथमिक सोसायटीच्या वतीने सांगोला तालुक्यातील मयत शिक्षकांच्या वारसाना मदत

सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने मृत सभासदांच्या वारसांना “कुटुंब कल्याण निधी” योजने अंतर्गत सहाय्यता निधी रु. २ लाखांचा चेक देऊन मदत करण्यात आली.
सांगोला तालुक्यातील जवळे गावचे कै. महादेव विश्वनाथ सुरवसे गुरुजी व किडेबिसरी येथील कै. प्रमोद नाथा बनसोडे गुरुजी यांच्या वारसांना त्यांचे घरी जाऊन संस्थेचे संचालक व संघटनेचे पदाधिकारी यांनी चेक प्रदान केला.
यावेळी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक गुलाबराव पाटील, रविंद्र पाटील, मा. संचालक केशवराव घोडके, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सुहास कुलकर्णी, हरिदास घोडके,ज्येष्ठ शिक्षक नेते विकास साळुंखे पाटील, राजू सावंत, मधूकर भंडारे , शिक्षक संघाचे सरचिटणीस वसंत बंडगर, प्रफुल्लकुमार आमले, विश्वजीत देशमुख,सचिन बागल, तालुका प्रसिद्धीप्रमुख गणेश व्हनखंडे उपस्थित होते.