फॅबटेक ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न…

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचा इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दहावीनंतर पुढील शिक्षण म्हणजे अकरावी बारावी ज्युनिअर कॉलेज हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट असतो. आणि अकरावी सायन्सला प्रवेश घेऊन त्यांनी त्यांच्या जीवनातील यशस्वी होण्याचे पहिले पाऊल टाकले. विद्यार्थी हा कॉलेजचा आत्मा असतो आणि कॉलेजही विद्यार्थी मनाच्या आवाजाचा कानोसा आपल्या सर्वांचेही नकळत घेत असते आणि त्यामुळेच त्यांच्या कॉलेजचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रप्रमुख डॉ नामदेव भोसले हे लाभले तसेच या कार्यक्रमास फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर वर्षा कोळेकर, सुपरवायझर वनिता बाबर सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजनाने केली. कॉलेजचे प्राचार्य यांनी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांनी अकरावीच्या विद्यार्थ्यांचेही पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत केले. ज्यू. कॉलेजच्या प्रा.रेशमा तोडकर यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे स्वागत केले व कॉलेज कॅम्पस बद्दल माहिती सांगितली तसेच क्रॉप सायन्स व जनरल सायन्स नंतर करिअरमधील संधी सांगितल्या.
इयत्ता बारावीची विद्यार्थिनी ऋतुजा पवार तसेच अकरावीचे प्रतीक पाटील, सायली हांडे , समृद्धी मोरे, प्रतिक येलपले, विश्वजीत हिप्परकर, करिष्मा मुलाणी ,स्वप्नजा लेंडवे या विद्यार्थ्यांनी दिलखुलासपणे आपले मनोगत व्यक्त केले व आमच्या शालेय जीवनात पहिल्यांदाच एवढा मोठा स्वागत समारंभ आमच्यासाठी आयोजित केला त्याबद्दल ऋण ही व्यक्त केले. तसेच प्रमुख पाहुणे माजी केंद्रप्रमुख डॉ भोसले सर यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब रुपनर,मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी प्राप्ती दादासाहेब आलदर व कुमारी अपूर्वा यलमार यानीं केले व कुमारी पूजा माळी हिने आभार व्यक्त केले.



