मोठी बातमी………सांगोल्यात पुन्हा ए.टी.एम.मशिन फोडण्याचा प्रयत्न

सांगोला(प्रतिनिधी):-अज्ञात चोरट्यांनी ए टी एम मशीन मधील पैसे चोरण्याचे उद्देशाने ए टी एम मशीन गैस कटरचे साहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना 24 जुलै रोजी पहाटे 3 वाजणेच्या सुमारास घडली.  फिर्याद किरण लांडगे (रा. स्वातंत्र सैनिक नगर डब्लु आय टी कॉलेजचे पाठीमागे, सोलापुर) यांनी दिली आहे.

दि.24/07/2024 रोजी पहाटे 03/10 वा चे सुमारास अज्ञात चोरट्याने मुद्दाम लबाडीने सांगोला शहरातील कडलास नाक्यावरील एस बी आय बँकेचे ए टी एम मशीन मधील पैसे चोरण्याचे उद्देशाने ए टी एम मशीन गैस कटरचे साहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोना वाकीटोळ हे करीत आहेत.

गेल्या आठवड्यात मिरज रोड वरील एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पुन्हा एकदा एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्यामुळे एटीएम सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button