crimemaharashtrasangola

सांगोला तालुक्यात वाढले अपघात, गुन्हेगारी, आत्महत्या, चोऱ्या

तालुक्यात खाजगी सावकरांचा वाढला सुळसुळाट

HTML img Tag Simply Easy Learning    

तालुक्यात अपघात, गुन्हेगारी, आत्महत्या, चोऱ्या, अवैध धंदे याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने शांतता सुरक्षितता धोक्यात आली असून गुन्ह्यावरून कलम न लावता पैसा व पुढारी यांच्या सांगण्यावरून कलम लावत असल्याने तालुक्यात विविध पक्षातर्फे मोर्चा तसेच बंद करण्याची वेळ येत असून याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख यांनी तात्काळ लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे

तालुक्यातील महूद येथे गुन्हेगारीचे ठिकाण बनत आहे दोन महिन्यापूर्वी स्फोट झाला त्या स्फोटात
एक तरुण मयत झाला, त्यानंतर खून झाला मुख्य सूत्रधार मोकाट आहे अशा अनेक घटना मुळे पोलिसा वरील विश्वास नागरिकांचा राहिला नाही पोलिसांच्या चिरीमिरी मुळे गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे गुन्हेगारांवर वचक राहिला नाही जुगार सट्टा हे तालुक्याला कधी माहीत नव्हते परंतु अलीकडे यातही सांगोला आता मागे राहिले नाही चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने शहरातील माणूस दोन दिवस घर सोडून बाहेरगावी जाण्याचे धाडस करत नाही खाजगी सावकरांचा सुळसुळाट वाढला आहे सहकार खात्याचे त्याच्यावर नियंत्रण नाही त्यातून कर्ज घेणाऱ्यास आत्महत्या करावी लागत आहे

सहकारी पतसंस्थेचा ही रामभरोसे  कारभार आहे एखाद्या पतसंस्थेच्या सभासदाचे कर्ज 30000 रुपये राहिले म्हणून सदर कर्जदारास घरातून बोलावून नेऊन पतसंस्थेत दिवसभर बसविणे मानसिक त्रास देणे यातून 32 वर्षाच्या युवकांस आत्महत्या करावी लागली अशा घटना तालुक्यात घडत आहेत त्याचा तपास होत नाही गुन्हेगारास शासन होत नाही त्यामुळे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढतात आणि नाहक गोरगरिबांना जीव गमवावा लागत आहे

तालुक्यातील काही  पोलीस कर्मचारी वर्ग भ्रष्टाचारी मार्गाचा अवलंब करीत असल्याने गुन्ह्याचे कलम गुन्ह्यावरून न लावता पैशावरून कलम लावले जाते ही घटना दोन दिवसापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने उघडकीस आणली आहे

लहान तरुण मुलांजवळ दुचाकी वाहन चालवायचे परवाने नसूनही शहरातून सदर तरुण बेफाम गाड्या चालवतात पायी चालणाऱ्या महिला ,ज्येष्ठ ,नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे ट्रॉफीक पोलीस पंढरपूर रोडवरील उड्डाणपुलाजवळ थांबलेले असतात सांगोल्यातील पोलीस यंत्रणा पूर्णपणे भ्रष्टाचाराने भरकटलेली आहे त्यामुळे कायद्याचा वचक, भीती राहिली नाही.

पूर्वी गावातील मुख्य पुढारी एखाद्या व्यक्तीबद्दल पोलीस स्टेशनला जात असे आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न होत असे परंतु अलीकडे पुढाऱ्याचं कुणी ऐकतच नाही. पोलिसांच्या बदल्या तीन वर्षे झाले की होणे गरजेचे आहे सदर पोलीस कर्मचारी तरीही तीन ते पाच वर्षात मालामाल होऊन जात आहे याबाबत वरिष्ठांनी त्याची दखल घेऊन कडक शिस्तीचे अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांची तालुक्याला गरज असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!