सांगोला रोटरी क्लब तर्फे गुरु पौर्णिमा साजरी
सांगोला- सांगोला रोटरी क्लब तर्फे गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून शहरातील तीन सेवानिवृत्त शिक्षक व प्राध्यापकांना सन्मानित करण्यात आले.अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेले सेवानिवृत्त शिक्षक ह भ प दत्तभक्त सुभाष लऊळकर सर, सांगोला महाविद्यालयातील सेवानिवृत्त वाणिज्य विभाग प्रमुख रेड्डी सर व सध्या सेवानिवृत्तीनंतरही कार्यरत असलेले माणदेश महाविद्यालय जुनोनीचे प्राचार्य डॉ.बी.आर.फुले यांना रोटरी अध्यक्ष रो.इंजि.विकास देशपांडे व सचिव रो.इंजि.विलास बिले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रम रो.संतोष गुळमिरे यांच्या एखतपुर रोड,शिक्षक कॉलनी येथील निवास स्थानी संपन्न झाला.त्याच प्रमाणे रो.संतोष गुळमिरे यांच्या वाढदिवसानिमित्त उभयतांचा सत्कार करण्यात आला.रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.इंजि.विकास देशपांडे यांनी आपल्या मनोगतात गुरु बद्दल भाव आणि आदर व्यक्त केला
सांगोला रोटरी क्लबने आपल्या कार्यातुन जण मानसात स्थान निर्माण केले आहे.जे का रंजले,गंजले त्यासी म्हणावे आपुले ,देव तेथेची जाणावा या उक्ती प्रमाणे रोटरीचे कार्य सुरु असल्याची कौतुकाची थाप देवून सत्काराबद्दल सुभाष लऊळकर सर यानी कृतज्ञता व्यक्त केली.डॉ.भीमराव फुले व प्रा.रेड्डी यानी मनोगत व्यक्त केले.रोटरी अध्यक्ष रो.इंजि.विकास देशपांडे यांनी प्रास्ताविक व सचिव रो. इंजि.विलास बिले यानी आभार प्रदर्शन केले.सौ.हर्षा गुळमिरे यांच्या उत्कृष्ठ काव्यवाचनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सदर कार्यक्रमास रो.इंजि.अशोक गोडसे रो. इंजि.संतोष भोसले रो.धनाजी शिर्के रो.दीपक चोथे रो.सुरेशअप्पा माळी रो.मोहन मस्के सर रो.माणिकराव भोसले रो.डॉ.अनिल कांबळे रो.सजिकराव पाटील रो.डॉ.मच्छिंद्र सोनलकर रो. ऍड.सचिन पाटकुलकर रो.महेश गवळी रो.श्रीपती आदलिंगे रो.निसार इनामदार रो.शरणाप्पा हळळीसागर रो. प्रा.राजेंद्र ठोंबरे रो.प्रा.महादेव बोराळकर रो.प्रा.भगवंत कुलकर्णी इत्यादि रोटरी सदस्य हजर होते.