संभाजी ब्रिगेडने केला सफाई कामगार महिलांचा सन्मान..

8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त संभाजी ब्रिगेड च्या वतीने कडलास ग्रामपंचायत मधील सफाई कामगार महिलांचा शाल,साडी,चोळी,गुलाब पुष्प व मिठाई देऊन महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला
8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून हा दिवस जगभर उत्साहात साजरा करण्यात येतो.या दिवशी कर्तबगार महिलांचा सन्मान सगळीकडे होत असतो,परंतु सकाळपासून ठिकठिकाणी पडलेला कचरा , सगळा परिसर स्वच्छ करून त्या पगारातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवून संसाराचा गाडा ओढणाऱ्या व आपल्या मुलांना शिक्षण देणाऱ्या या सफाई कामगार महिलांचा सन्मान संभाजी ब्रिगेड च्या वतीने कडलास ग्रामपंचायत मध्ये करण्यात आला.यावेळी संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष प्रदीप मिसाळ पाटील,सरपंच दिगंबर भजनावळे,उपसरपंच सौ ताई माने,ग्रामविकास अधिकारी ताटे भाऊसाहेब, ग्रा पं सदस्य ,कडलास शाखा अध्यक्ष संग्राम गायकवाड, ता उपाध्यक्ष आकाश ठोकळे,सागर गायकवाड,प्रवीण सुतार,महेश गायकवाड,निलेश अनुसे इत्यादी उपस्थित होते.
समाज आमच्याकडे सफाई कामगार म्हणून जरी बघत असला तरी आम्ही प्रामाणिकपणे कष्ट करून जीवन जगत आहोत. आमच्या सारख्या तळागाळातील कष्टकरी घटकाची दखल घेऊन संभाजी ब्रिगेड ने जो आमचा मान सन्मान केला त्याबद्दल संभाजी ब्रिगेड चे आम्ही आभारी आहोत असे सफाई कामगार महिलांनी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संग्राम गायकवाड तर आभार ताटे भाऊसाहेब यांनी मानले