जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निजामपूर येथे शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा

शासकीय परिपत्रकानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निजामपूर येथे दिनांक 22 जुलै 2024 ते 28 जुलै 2024 या कालावधीत शाळेमध्ये शिक्षण सप्ताह हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये गोडी वाढण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात आले.
या उपक्रमांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपारिक वेशभूषा, वृक्षारोपण, पारंपारिक खेळ, मातीकाम, कागदकाम, संगणकाच्या साह्याने शिक्षण, रंगभरण, मराठी व गणित पेटीचा साह्याने अध्यापन व विविध कृतींद्वारे स्वयंअध्यापन अशा विविध प्रकारे उपक्रम राबवण्यात आले. वर घेतलेल्या प्रत्येक उपक्रमात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन शिक्षण सप्ताहाचा आनंद घेतला.कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी दिनांक 28 जुलै 2024 या दिवशी विद्यार्थ्यांना लोकवर्गणीच्या माध्यमातून मिष्टान्न देण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निजामपूरचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब चंदनशिवे विषय शिक्षक सुभाष क्षीरसागर उपशिक्षक श्री दत्तात्रय नकाते व श्री अंकुश घाडगे यांचे मोलाचे योगदान होते. सदर शिक्षण सप्ताहासाठी सांगोला तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री सुयोग नवले व अकोला केंद्राचे केंद्रप्रमुख श्री दत्तात्रय शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांचही विशेष आभार.



