सांगोला रेल्वे स्टेशन मास्तर एस.एन.सिंह यांचा दिपक चोथे परिवाराकडून सत्कार

सांगोला- महाराष्ट्र हा पुढारी किवा नेते मन्डळीच्या नावाने ओळखण्या ऐवजी छ.शिवाजी महारज यांच्या नावाने ओळखला जातो,तसा बिहार हा लालूप्रसाद किंवा राबडी देवी यांच्या नावाने ओळखण्या ऐवजी सम्राट अशोक यांच्या नावाने ओळखला जाणे अपेक्षीत आहे,असे मनोगत सांगोला रेल्वे स्टेशन मास्तर एस.एन.सिंह यांनी व्यक्त केले.
सांगोला शहरातील प्रसिध्द व्यावसायिक दिपक चोथे यांचे मित्र असलेल्या सिंह यांची बदली होट्गी या ठिकाणी झाली आहे.त्याबद्दल त्याना निरोप देण्यासाठी चोथे यांच्या मिरज रेल्वे गेट जवळ असणाऱ्या निवास स्थानी सिंह यांचा सत्कार करण्यात आला.त्या वेळी झालेल्या अनौपचारिक गप्पा मध्ये सिंह यांनी त्यांच्या बिहार राज्याची ओळख सांगितली.
मागे एकदा शरद पवार म्हणाले होते की शाळा- महाविद्यालय यांची ओळख संस्था चालक यांच्या नावाने न होता.प्राचार्य – मुख्याध्यापक यांच्या नावाने होण्यात खरा सन्स्कार आहे, त्या विचाराची ओळख सिंह यांच्या विधानाने झाली. सांगोला हे गुणी व सदाचारी लोकांचे शहर असुन रोटरी क्लब व दिपक चोथे यांच्या मुळे सांगोल्यात एकरुप झाल्याचे सिंह म्हणाले.या सत्कार प्रसंगी सिंहगड चे प्राचार्य साजिकराव पाटील,पत्रकार मोहन मस्के,प्रा.राजेंद्र ठोंबरे,सार्वजनिक बांधकाम विभाग इंजि.नकाते उपस्थित होते.



