नंदेश्वर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

नंदेश्वर ता-मंगळवेढा येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त श्री समर्थ सद्गुरु बाळकृष्ण माऊली मंदिरात शनिवार दिनांक २० जुलै रोजी सकाळी ठिक नऊ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरासाठी सांगोला येथील रेवनिल ब्लड बँक उपस्थित राहणार आहे.या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मठाधिपती बाळासाहेब महाराज यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर सायंकाळी ठिक सात वाजता संगीत भजन व कीर्तनसेवा होणार आहे.
दिनांक २१ जुलै रोजी सकाळी ठिक सात वाजता पुजा,दहा वाजता मठाधिपती बाळासाहेब महाराज यांच्या हस्ते समर्थ सद्गुरु बाळकृष्ण माऊली यांची पाद्यपूजा होणार असून त्यानंतर प्रवचन व महाप्रसादाने गुरुपौर्णिमेची सांगता होणार आहे.तरी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष शिवशंकर लाड यांनी केले आहे