सांगोला तालुकाशैक्षणिक

सांगोला विद्यामंदिर वार्षिक स्नेहसंमेलन सन २०२२-२३पहिला दिवस उत्साहात संपन्न

विविध गुणदर्शन व एकता चाळीत ऐश्वर्या ‘ नाटिकेने जिंकली प्रेक्षकांची मने

सांगोला (प्रतिनिधी)सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन २०२२-२३ काल गुरूवार,दि. २२डिंसेबर २०२२ रोजी उत्साहात सुरुवात झाली. यामध्ये दुपारच्या सत्रात संपन्न झालेल्या विविध गुणदर्शन व ‘एकता चाळीतील ऐश्वर्या’ या नाटिकेने प्रेक्षकांची मने जिंकली.

 


वार्षिक स्नेहसंमेलन पहिल्या दिवशी सकाळी आठ वाजता सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थापक अध्यक्ष कै.चं.वि. तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास विद्यार्थी शिक्षक दिन ज्युनिअर कॉलेज प्राचार्या वैष्णवी ढोबळे व प्रशाला मुख्याध्यापक सानिका पाटील यांच्या हस्ते व ज्युनिअर कॉलेज जनरल सेक्रेटरी स्वाती हजारे, प्रशालेची जनरल सेक्रेटरी अस्मिता जाधव, ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी प्रतिनिधी सायली दिक्षीत, प्रशालेची विद्यार्थिनी प्रतिनिधी विदिशा इंगोले यांच्या उपस्थितीत पुष्पहार समर्पित करण्यात आला. यावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व कॉलेजच्या प्राचार्य भीमाशंकर पैलवान, उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे, उपप्राचार्य गंगाधर घोंगडे, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार बिभीषण माने , ज्युनिअर कॉलेज उत्सव विभाग प्रमुख प्रा.धनाजी. चव्हाण,प्रशाला उत्सव विभाग नरेंद्र होनराव उपस्थित होते.
यावेळी प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थी शिक्षकांनी एक दिवसाचा शाळा चालवण्याचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांचा उत्साह त्यांचा आनंद, नीटनेटकेपणा सर्वांच्या नजरेत भरण्यासारखा होता. काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे तर काहींनी सेवकांचे काम करून श्रम प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न केला. समरोपामध्ये विद्यार्थी शिक्षकांनी आपल्या मनोगतात प्रत्यक्ष वर्गात अध्यापनासंदर्भातील अनुभव व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी शालेय कामकाज व्यवस्थित सांभाळल्याबद्दल प्राचार्य भीमाशंकर पैलवान व उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे यांनी विद्यार्थी शिक्षकांचे आभार मानले. विद्यार्थी शिक्षक दिन यशस्वी प्रभावी होण्यासाठी प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी शिक्षक दिन प्राचार्य,मुख्याध्यापक, विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.त्यांना ज्युनिअर कॉलेज विद्यार्थी शिक्षक दिन प्रमुख प्रा.चिंतामणी देशपांडे, सहाय्यक प्रा.महेश जुंदळे तर प्रशालेचे प्रमुख सचिन बनकर, बंडू लेंडवे सहाय्यक सिताराम राऊत, निलेश जंगम यांचे मार्गदर्शन मिळाले.

 

दुपारचे सत्र विविध गुणदर्शन व नाटिका उद्घाटन परीक्षक प्रा.महेश विभुते,केशव निसाळ व चेतन कोवाळे यांचे हस्ते नटराज पूजन व कै.गुरुवर्य बापूसाहेब व कै.बाईसाहेब झपके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाले.यानंतर ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा बहारदार विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये वैयक्तिक नृत्य, सामुदायिक नृत्य, नकला व एकपात्री नाटक यासाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच प्रा.इसाक मुल्ला, प्रा.सौ.शहिदा सय्यद यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘एकता चाळीत ऐश्वर्या’ या नाटिकेने प्रेक्षकांना खळखळून व मनमुराद हसवले. सदर विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पाडण्यासाठी ज्युनिअर कॉलेज सांस्कृतिक विभाग प्रा.इसाक मुल्ला,प्रशाला सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रशांत रायचुरे व सांस्कृतिक विभागातील शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. सदर सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकारी,उत्सव विभाग,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले व कार्यक्रम यशस्वी केला.

चौकट- आज शुक्रवार, दि. २३ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ८:०० वाजता प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहार व फिशपाँड्स अर्थात शेलापागोटे,१०:०० वाजता फनफेअर, विज्ञान प्रदर्शन, कला प्रदर्शन व रांगोळी प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन तर दुपारी २:०० वाजता प्रशालेतील विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!