सांगोला नगरपरिषद व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या माध्यमातून स्वयंसहायता महिला बचत गटांना सवलतीच्या व्याजदरातील कर्जाचे वितरण
सांगोला नगरपरिषद अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या केंद्रशासन पुरस्कृत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) या योजनेंतर्गत महिला सक्षमीकरण व त्यांचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम घेतले जातात. या अनुषंगाने सांगोला शहरामध्ये २०० पेक्षा अधिक स्वयंसहाय्यता महिला बचत गट स्थापन करण्यात आलेले आहेत. बचत गटांना अंतर्गत कर्ज व्यवहारासाठी नगरपरिषदेच्या वतीने र.रु. १००००/- इतका फिरता निधी अनुदान म्हणून दिला जातो. त्याच प्रमाणे ज्या बचत गटांना स्थापन होऊन सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला असेल अशां बचत गटांना बँकेच्या सवलतीच्या व्याज दराने नगरपरिषदे अंतर्गत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान या योजनेच्या माध्यमातून शहारातील महावीर व शिवसमर्थ या स्वयंसहायता महिला बचत गटांना महाराष्ट्र बँकेच्या माध्यामातून व्यवसाय वाढीसाठी अनुक्रमे र.रु. ८ लक्ष व ५ लक्ष इतक्या कर्जाचे वितरण मा.मुख्यधिकारी तथा प्रशासक डॉ.सुधीर गवळी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक श्री नागेश गुंजोटे व सहा.प्रकल्प अधिकारी श्री योगेश गंगाधरे हे उपस्थित होते. तसेच धनादेश स्वीकारण्यासाठी महावीर व शिवसमर्थ या दोन्ही बचत गटांच्या अध्यक्षा, सचिव व सर्व महिला सदस्य उपस्थित होते.
—————————
*सांगोला नगपरिषदेच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानच्या माध्यातून बचत गटातील महिला बँकेकडून मिळणाऱ्या सवलतीच्या व्याजदरातील कर्जाच्या मदतीने स्वत:चा व्यवसाय सुरु करून आर्थिक दृष्ट्या सक्षम व आत्मनिर्भर होत आहेत.*
*डॉ.सुधीर गवळी*
*मुख्याधिकारी तथा प्रशासक*
*नगरपरिषद सांगोला*
—————————