महाराष्ट्र
न्यू इंग्लिश स्कूल तालुकास्तरीय आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित

सांगोला शहरातील नामांकित न्यू इंग्लिश स्कूल ला सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळातर्फे देण्यात येणारा तालुकास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाला आहे. लोकमंगल कॅालेज वडाळा, सोलापूर येथे झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात हा पुरस्कार न्यू इंग्लिश स्कूल ला प्रदान करण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते प्रशालेतर्फे सायली खडतरे मॅडम यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कारामुळे न्यू इंग्लिश स्कूल च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण व नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे न्यू इंग्लिश स्कूलने शैक्षणिक क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. हा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर प्रशालेच्या प्रांगणात संस्थासंचालक डॅा. अशोकराव शिंदे यांच्या हस्ते सर्व पदाधिकारी व शिक्षकांचे गुलाबुष्प देवून सन्मान करण्यात आला.
त्याचबरोबर सोलापूर जिल्हा अध्यापक मंडळातर्फे जिल्हास्तरीय विज्ञान प्रज्ञा परीक्षेत तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल प्रशालेतील संचिता संजय देशमुख हिचा ट्रॅाफी, प्रमाणपत्र देवून यथोचित सन्मान करण्यात आला.
सदरचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मुख्याध्यापक व सर्व शिक्षक-विद्यार्थीांचे अभिनंदन सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॅा. अनिकेत देशमुख, सचिव विठ्ठलराव शिंदे सर, संचालक डॅा.अशोकराव शिंदे, प्रा.दिपकराव खटकाळे, प्रा.जयंत जानकर यांनी केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.



