महाराष्ट्र

रोटरी क्लबकडून बसविण्यात आले सिमेंट बाक 

स्किन क्लिनिक डॉ.करमुडे व रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने धायटी येथे ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी सिमेंटचे बाक बसवण्यात आले.दररोज संध्याकाळी बरेचसे ज्येष्ठ नागरिक फिरणेसाठी व मंदिरासाठी येतात तेंव्हा ज्येष्ठ नागरिकांना थकल्यासारखे होते त्यावेळी विश्रांतीसाठी हे बाक उपयोगी येतात. त्यांची सोय व्हावी या हेतूने क्लबने हा उपक्रम घेतला. याप्रसंगी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी क्लबचे आभार व्यक्त केले.या प्रसंगी मंदिरातील पुजारी व वनविभागाचे कर्मचारी  हजर होते.
या प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.इंजि.विकास देशपांडे, सचिव रो.इंजि.विलास बिले,रो.माणिक भोसले,रो. इंजि.अशोक गोडसे, व इतर नागरिक उपस्थित होते.या उपक्रमासाठी स्किन क्लिनिक डॉ. करमुडे यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button