महाराष्ट्र
रवळनाथ च्या पुनर्गुतवणूक ठेवीवर ११.३४ टक्के परतावा व्याजदर: श्री. एम. एल. चौगुले

सांगोला:- येथील श्री रवळनाथ को-ऑप हौसिंग फायनान्स सोसायटी लि., आजरा (मल्टी-स्टेट) या संस्थेने आकर्षक व उच्च व्याजदराची श्री रवळनाथ पुनर्गुतवणूक आणि मुदतबंद ठेव योजना सुरु केली आहे. या योजनांच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांना त्यांची बचत आत्मविश्वासाने वाढवण्याची संधी देत आहोत, अशी माहिती ‘रवळनाथ’चे संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले यांनी दिली.
समाजातील सर्वच घटकांना बचतीची सवय लागावी, तसेच त्यांची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने या योजना सुरु करण्यात आल्या आहेत. या दोन्ही योजने अंतर्गत किमान रुपये २५ हजाराच्या पटीत ६३ महिने कालावधीसाठी गुंतवणूक करावयाची आहे. पुनर्गुतवणूक ठेव योजनेत मुदतीनंतर ११.३४ टक्के व्याजदराने परतावा मिळणार आहे. तर मुदतबंद ठेव योजनेत गुंतवणूकीवर ९ टक्के व्याजदराने तिमाही व्याज घेता येणार आहे. १ फेब्रुवारी २०२५ ते ३१ मार्च २०२५ अखेर या मर्यादीत कालावधीसाठी ही योजना सुरु राहील.
ग्राहकांना आकर्षक व्याजदर देऊन त्यांच्या आर्थिक स्थिरतेला प्राधान्य देण्याचा संस्थेचा प्रयत्न राहीला आहे. या ठेव योजनेत समाजातील सर्व स्तरातील घटकांना सहभागी होता येणार आहे. ग्राहकांनी याचा लाभ घेण्यासाठी संस्थेच्या आजरा, गडहिंग्लज, चंदगड, नेसरी, कोल्हापूर, जयसिंगपूर, बेळगाव, निपाणी, कुडाळ, सांगली, पुणे, कराड, सांगोला, चिक्कोडी या शाखेंशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले, उपाध्यक्षा सौ. मीना रिंगणे यांच्यासह सर्व संचालकांनी केले आहे.
——————————————
योजना मर्यादीत कालावधीसाठी
या दोन्ही योजना दि. १ फेब्रुवारी २०२५ ते ३१ मार्च २०२५ अखेर या मर्यादीत कालावधीसाठी असून सुरक्षित गुंतवणुकीसाठी ग्राहकांना संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असेही श्री. एम. एल. चौगुले यांनी सांगितले.



