वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात शिक्षण सप्ताह उत्साहपूर्ण वातावरणात साजरा

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात  महाराष्ट्र शासनाच्या  आदेशानुसार शिक्षण सप्ताह  जुलै 2024  आनंदाने व हर्षोल्हासामध्ये  साजरा झाला.
सप्ताहाच्या  सुरूवातीच्या दिनी विद्यार्थ्यांनी तयार केलेली साधने व वाचन संस्कृती दिवस साजरा केला.  दुसऱ्या दिवशी मुलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिनानिमित्त गटागटामध्ये गणितीय साहित्य हाताळून तसेच विविध प्रकारची कोडी सोडवून साजरा केला. तिसरा दिवस क्रीडा दिन होता. त्या दिवशी लेझीम, धावणे, सुरफाट्या, लगोरी, लंगडी यासारख्या देशी व मजेशीर खेळाचा विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. चौथ्या दिवशी सांस्कृतिक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा तसेच काही रेकॉर्ड डान्सचे सादरीकरण केले. 5 व्या कौशल्य व डिजिटल साक्षरता दिनी विद्यार्थ्यांनी स्वतः संगणक हाताळले तसेच त्यांनी तयार केलेल्या विविध मातीच्या -कागदी वस्तू, नाणी संग्रह, पुष्पगुच्छ यांची प्रात्यक्षिक सादरीकरण केले. नियोजित केले प्रमाणे सहाव्या दिवशी पर्यावरण संरक्षण दिंडी व वृक्षारोपण संपन्न झाले. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी स्नेह भोजनाचे आयोजन केले होते.  सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी स्नेह भोजनाचा मनसोक्त आनंद घेतला. आनंदाने व अतिशय सुंदर पद्धतीने शिक्षण सप्ताहाची सांगता झाली.
शेवटी प्रशालेचे मुख्याध्यापक पवार सर यांनी शिक्षण सप्ताह यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर वृंद यांचे आभार मानले. एकंदरीत अतिशय आनंदाने, जल्लोषात मनमुराद अशा सप्ताहाची प्रशालेत सांगता झाली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संतोष कुंभार सर यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button