सांगोला विद्यामंदिरचे गणित प्रज्ञा व पारंगत परीक्षेत सुयश

सांगोला (वार्ताहर) महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ यांचेकडून घेण्यात आलेल्या गणित प्रज्ञा व पारंगत परीक्षेमध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील इयत्ता पाचवी, आठवी व दहावी मधील विद्यार्थ्यांनी यश संपादन करत राज्यस्तरीय प्रमाणपत्र व ट्रॉफी मिळवली.

यामध्ये इयत्ता पाचवीमधील कुमारी तनिष्का विनोद जाधव, कुमारी अक्षरा अजित नवले, कुमारी स्नेहा संतोष टकले, कुमारी ओवी अभिजीत तारळेकर, कुमार समर्थ सुनील वेळापुरे व कुमार अजिंक्य बंडोपंत वाघमोडे आणि इयत्ता आठवीमधील कुमारी सानिका राजू चौगुले, कुमारी यशश्री सचिन गायकवाड, कुमारी जिज्ञासा तानाजी घाडगे, कुमार विश्वजीत अर्जुन जाधव, कुमार अथर्व रुपेश खटकाळे, कुमारी वेदांगी हेमंत नीलकंठ, कुमार दिग्विजय संभाजी पवार, कुमारी श्रेया कृष्णदेव पवार व कुमार तेजस तानाजी सावंत हे विद्यार्थी प्रज्ञा पात्र झाले.

इयत्ता दहावी मधील कुमार सार्थक नवनाथ तळे (जिल्ह्यात प्रथम), कुमार अर्णव दत्तात्रय मराठे, कुमार सुजल निनाद मोरे, कुमारी आसावरी अविनाश कुलकर्णी हे विद्यार्थी पारंगत परीक्षेत यशस्वी झाले.

या विद्यार्थ्यांना प्रशालेतील वैभव कोठावळे, नागेश पाटील, विद्या जाधव, शितल कांबळे, भारती गयाळी, दिग्विजय चव्हाण, उत्तम सरगर, भाग्यश्री मिरजे, सचिन बुंजकर, अजित मोरे, शिवाजी चौगुले, नामदेव खंडागळे, सचिन बनकर, उज्वला कुंभार, प्रदीप धुकटे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे सर, खजिनदार शंकरराव सावंत सर, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके साहेब, कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके साहेब, प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका शाहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, मच्छिंद्र इंगोले, प्रदीप धुकटे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करत पुढील परीक्षेसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button